संपूर्ण राजकीय हयातीत कॉंग्रेस द्वारे बदनामी व टिका झेलणारा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर- आयु. सुरेश शिरसाट (भाग १)
“नव्वदच्या दशकात अकोल्यात एक वर्तमानपत्र जाळले होते ?” का ? व कोणते ?
मा बाळासाहेब आंबेडकरांवर कॉंग्रेसची टिका नवीन नाही.1980 ते 2024 या 44 वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीत सातत्याने बाळासाहेब विरोधकांच्या टिकेचा सामना करत आहेत.गेली 44 वर्षे मी हे स्वतः अनुभवतोय.आमचे मोठे भाऊ बी आर शिरसाट हे बाळासाहेबांच्या नेतृत्वातील संघटनेत सम्यक समाज आंदोलन समिती, भारतीय रिपब्लिकन पक्ष व पूढे भारिप बहुजन महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष पदावर राहिल्याने हे सर्व जवळून पाहता आलं व त्याचा एक भाग होता आलं.
आज ज्यांचं वय 45-50 /50-55 वर्षे आहे तेही बाळासाहेबांवर टिका करायला ‘लाजत ‘ नाहीत. मी लाजत नाही यासाठी म्हणतो की, बाळासाहेबांचं राजकीय आयुष्यच 44 वर्षाचं आहे. टिकाकारचं वय बघीतलं की, ह्यांना तेंव्हा चड्डीही नेसता येत नव्हती किंवा ते चड्डीत तरी असावेत! ठिक आहे, टिका करा.डॉ बाबासाहेबांनीच तो आपल्याला अधिकार दिला आहे. परंतु बाळासाहेब आंबेडकरांचे, त्यांच्या 44 वर्षांच्या चळवळीतील श्रमाचे,अपार कष्टाचे,शब्दातीत त्यागचं, योगदानाचं, शून्यातून निर्माण केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील दखलपात्र बनवण्या इतपत चळवळीचे मुल्यमापन, अभ्यास करणार की नाही ?
ऐंशीच्या दशकातील चळवळीची अवस्था व बाळासाहेबांची राजकारणात एन्ट्री
गलितगात्र झालेली आंबेडकरी चळवळ व मृतप्राय झालेला रिपब्लिकन पक्ष, गटातटात व पोटजातीत अडकलेली चळवळ, “सिट ऑर नॉट सिट वोट फॉर कॉंग्रेस ” एवढ्या लाचारीला नेवून ठेवणारे तात्कालीन रिपाइंचे नेतृत्व, नामांतराच्या लढाईत पुरती गारद झालेली चळवळ,राष्ट्रीय पातळीवर गटातटामुळे रिपब्लिकन पक्षाची झालेली हास्यास्पद इमेज असे ऐंशीच्या दशकातील चळवळीचे चित्र होते.
अशा परिस्थितीत 1980 मध्ये अॅड बाळासाहेब आंबेडकर राजगृहा बाहेर पडतात. महाराष्ट्र पालथा घालतात. गावोंगाव पिंजून काढतात. लोकांचे म्हणणे ऐकतात. लोकं बाळासाहेबांना चळवळीचे नेतृत्व करावे म्हणून गळ घालतात.चळवळीची दैना व कार्यकर्त्यांनी घातली गळ पाहून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारीक वारसदाराला होकार देण्याशिवाय पर्यायच नव्हता.तो क्षण चळवळीसाठी ऐतिहासिक होता. अभुतपुर्व होता. अभूतपूर्व यासाठी की,बाळासाहेबांनी चळवळीचे नेतृत्व करायला मान्यता दिल्यानंतर आंबेडकरी समूहामध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. मृतप्राय झालेल्या चळवळीला नवसंजीवनी मिळाली होती. चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद मावत नव्हता. प्रचंड प्रतिसाद मिळत होता.त्यापार्श्वभूमीवर चळवळीसाठी काहीही करण्याची, कष्ट उपसण्याची फौलादी हिंमत,जिद्द बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळे संबंध नव्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. भावनिक मुद्दे वगळून लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर मोर्चे, धरणे आंदोलने, उपोषणे, पायीयात्रा ,सभा, संमेलने, प्रशिक्षण शिबिरे,मेळावे यातून लोकमनं पेटवली,चेतवली. आणि विखूरलेल्या संघटनेत अल्पावधीतच चैतन्य निर्माण केले. बाळासाहेबांच्या सभेला मुंबई, पुण्यात त्या काळात हजारो लाखोंच्या संख्येने लोकं सहभागी व्हायचे उपस्थित राहायचे शहरं दणाणून सोडायचे. परंतु तात्कालिन वर्तमानपत्रात बातम्या ह्या चळवळीची, नेतृत्वाची खिल्ली उडवणाऱ्या असायच्या…उर्वरित पूढील भाग क्र 2 व क्र 3 जरूर वाचा.
सुरेश रा शिरसाट, अकोला
(विस्तारामुळे सदर पोस्ट एकुण 3 भागात विभागली आहे.)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत