महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
शोषणमुक्त समाज कधी होणार ?—

किशोर जाधव,सोलापूर
मो.नं.९९२२८८२५४१
एका गावात एका तरुणाने अचानक वैराग्य रूप धारण केले. गावाशेजारी आश्रम उभा करून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू लागला. लोक देणग्या देऊ लागले. फटकळ, बोलका पोपट असणारा हा स्वयंघोषित बाबा आता लोकांच्या प्रापंचिक समस्या वर, आजारपणावर उपाय देऊ लागला. अल्पावधीत त्याने प्रचंड माया गोळा केली. स्वतःची फसवणूक झाल्याचे काही लोकांच्या लक्षात आले. लोकांनी पोलिसात तक्रार केली. बाबाला अटक झाली. बाबा चा खेळ खल्लास झाला होता. परंतु काही काळासाठी तरी ' 'झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये' या ओळींचा साक्षात्कार या बाबानी लोकांना करून दिला.
एकेदिवशी माझ्या लहान मुलाला घेऊन मार्केटमध्ये गेलो असता मुलाने एक चॉकलेट घेण्याचा हट्ट केला. ते चॉकलेट अंडाकृती प्लास्टिकच्या औरना मध्ये होते. आत मध्ये दोन चॉकलेटच्या गोळ्या व छोटेसे खेळणे असणाऱ्या या चॉकलेट ची किंमत तब्बल पंचेचाळीस रुपये होती. आकर्षक पॅकिंग व बाल मानसशास्त्राचा बारकाईने अभ्यास करून तयार केलेले हे चॉकलेटचे उत्पादन मूल्य १० रुपये जरी धरले तरी ७५ % च्या पुढे मार्जिन मिळवत कंपनी नक्कीच ग्राहकांची लूट करत असेल असा विचार मनात आला. या चॉकलेटला मार्केटमध्ये खूप मागणी असल्याचेही समजले.अन मी मनाशीच म्हणालो 'झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये!'
असाच एक किस्सा वाचनात आला मुलाच्या लहान गटाच्या शाळेच्या प्रवेशासाठी एका नामांकित मोठया शिक्षण संकुलामध्ये एक सदगृहस्थ गेले होते . इंग्रजी माध्यमाच्या या शाळेची इमारत खूप देखणी होती. स्वच्छता व टापटीप वाखाणण्याजोगी होती. समोर फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केट बॉल, खेळांची मैदाने व लागूनच स्विमिंग टॅंक होता. प्रिन्सिपल च्या ऑफिस मध्ये ते ग्रहस्थ गेल्यानंतर प्रिन्सिपल ने त्यांना सांगितले की तुम्हाला मुलाचे कपडे, वही, पुस्तके, हे सर्व शाळेतूनच विकत घ्यावे लागेल. डोनेशन व फी देखील वेळेतच भरावी लागेल. त्या गृहस्थाने प्रिन्सिपल ला विचारले 'मग शिक्षणाचा कसं काय?' यावर प्रिन्सिपल म्हणाल्या 'शिक्षण मात्र तुम्हाला क्लास लावून पक्क करून घ्यावा लागेल?' तो ग्रहस्थ बाहेर आल. प्रवेशासाठी लांबच्या लांब रांग लागली होती. तो मनाशीच पुटपुटलो 'झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए!'
वरील सर्व उदाहरणे गर्दीचे मानसशास्त्र समजून घेण्यास फार फायदेशीर आहेत. गर्दीला संमोहित करता येते का? या प्रश्नाची उकल या काही उदाहरणातून होते.मेंढरा प्रमाणे एका मागून एक मान खाली घालून आपल्या स्वतःचे मत हरवून चालत जाणे हा प्रकार वरील उदाहरणात घडलेला दिसतो. गर्दीच्या मानसशास्त्राचे वैशिष्ट्ये असे की, व्यक्ती आपल्या स्वतःचे व्यक्तिमत्व हरवून जातो. अशा समूहामध्ये विचारांची कोंडी झाल्याचे ही ध्यानात येते. स्वतःचे वेगळे मत मांडण्याचे धाडस गर्दी मधील एखादा करतो आणि ही विचारांची कोंडी हळू फुटायला सुरुवात होते.
हिटलर, मोसोलिना सारख्या हुकूमशहानी गर्दीच्या मानसशास्त्राचा चा उपयोग करून हुकूमशाही प्रस्थापित केली. खरंतर जर्मनी व इटली इत्यादी देशातील हे हुकुमशहा जन आंदोलनाच्या लाटेवर आरोड होऊन सत्तेवर आले होते. भल्या बुऱ्या मार्गानी त्यांनी लोकांचा पाठिंबा मिळवला होता. निम्न मध्यम वर्गातील लोकांना श्रीमंत होण्याची आकांक्षा ते दाखवत राहिले. जर्मनीतील ज्यू तर इटलीतील साम्यवादी यांच्या या फॅसिस्टांनी हत्या केल्या. या हुकुमशांचे वैशिष्ट्य असे होते की ते बुद्धीपेक्षा भावनेला जास्त आव्हान करत होते. युक्तीवादापेक्षा त्यांना श्रद्धा अधिक जवळची वाटायची. त्यांना विरोध न करणारे,आज्ञा पालक हवे होते. त्यांना लोकशाही मान्य नव्हती. 'युद्धात मनुष्यातील उच्चतम गुण पुढे येतात', असे मोसोलिनाला वाटायचे. म्हणून या हुकूमशाहानी सतत हिंसाचार व युद्ध यावर भर दिला. धर्म, नीती, कला,अर्थ, साहित्य आणि समाज या सर्व क्षेत्रावर त्यांनी स्वतःचे अधिराज्य गाजवलं. हे फॅसिस्ट लोक आपला वंश सर्वात श्रेष्ठ आहे असं लोकांच्या मनावर सतत बिंबवत राहिले.
या सर्व गोष्टींचे अकलन केल्यानंतर हे ध्यानात येते की, समूहाचे शोषण करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. प्रवाहाच्या विरूद्ध पोहणे हे अवघड काम असते याउलट प्रवाहाचा भाग बनणे फारच सोपे असते. म्हणून ९९.९९ टक्के लोक प्रवाहाचा भाग बनतात. 'शोषणमुक्त समाज बनला पाहिजे' हे स्वप्नच राहणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर मी दुनिये वरच सोडतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत