प्रा. डॉ. शिवाजी ग्यानबा जेटीथोर यांची सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्रोफेसर) पदी पदोन्नती झाल्या बद्दल समाजाच्या वतीने सत्कार.

तुळजापूर :- रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे नुकत्याच झालेल्या माता रमाई जयंतीचे औचित्य साधून विशेष वंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिवच्या अध्यक्षा आयु. विजयमालाताई धावारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून TISS तुळजापूर चे संचालक प्रा. डॉ. रमेश जारे सर व शकुंतलाताई जारे, गजानन हिवाळे सर व त्यांच्या सुविद्य पत्नी त्याचबरोबर विशेष उपस्थिती प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर सर यांची होती. भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा तुळजापूर तालुका व जिल्हा शाखेचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण महाविद्यायात गत १२ वर्षांपासून मत्सशास्त्र विभागात काम करणारे तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर यांना असोसिएट प्रोफेसर ही पदोन्नती मिळाल्याबद्दल समाजाच्या, आनंद बुध्द विहाराच्या व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांचा पंचशील पताका, पुष्पगुच्छ व संविधान उद्देशीका प्रत देऊन छोटेखानी सत्कार करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजी नगर येथील मत्स्य शास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत तसेच प्राणीशास्त्र विषयात संशोधक मार्गदर्शक म्हणून उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
सत्कार स्वीकारत असताना सरांनी यश पाहिजे असेल तर कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी लागेल असे सांगितले. विद्यार्थी दशेतील व सुरुवातीच्या काळातील खडतर प्रवासात परिवाराची, कुटुंबाची मोलाची साथ मिळाली त्याबद्दल त्यांनी आभार मानले. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये राहून आपल्या समाजासाठी योगदान दिले पाहिजे जसं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी मुलांचे स्कॉलरशिप, होस्टेल याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपली पुढची पिढी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि संविधानाने दिलेले हक्क सुरक्षित ठेवता येतील असे महत्त्वपूर्ण निरीक्षण त्यांनी याप्रसंगी नोंदविले.
कार्यक्रमास समाजातील शिक्षक प्राध्यापक डॉक्टर इंजिनिअर वकील असे सर्व क्षेत्रातील मान्यवर, महिला व बालक बालिका उपस्थित होते.
खीरदान व सरणतेय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत