काय झालं काँग्रेस च्या सत्तर वर्षात ?

काय झालं काँग्रेस च्या सत्तर वर्षात ?
आत्मनिर्भर भारत…
स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया १९५४ ला पोलाद निर्मिती मध्ये भारत आत्मनिर्भर होण्यासाठी स्थापन झालं.
आय आय टीची स्थापना १९५६ मध्ये भारताला अभियांत्रिकी शिक्षणामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी झाली.
AIIMS ( एम्स ) ची स्थापना १९५६ मध्ये वैद्यकशास्त्र आणि आरोग्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी झाली.
ONGC ( ऑईल & नॅचरल गॅस कमिशन ) ची स्थापना १९५६ मध्ये भारताला नैसर्गिक वायू आणि इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी झाली.
DRDO ( डिफेन्स रिसर्च & डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ) ची स्थापना १९५८ मध्ये संरक्षण क्षेत्रात भारताला तांत्रिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी झाली.
HAL ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ) ची स्थापना १९६४ मध्ये भारताला विमान उद्योगात आत्मनिर्भर होण्यासाठी झाली.
BEML ( भारत अर्थमुव्हर्स लिमिटेड ) ची स्थापना १९६४ मध्ये भारताला धरण, रस्ते बांधकामाला लागणाऱ्या अवजड मशिनरी च्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी झाली.
हरितक्रांती ची सुरुवात भारताला अन्नधान्य पुरवठ्या मध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी १९६५ मध्ये झाली.
BHEL ( भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड ) ची स्थापना १९६५ विद्युत अभियांत्रिकी मध्ये भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी झालेली.
एचएलएल , हिंदुस्तान लॅटेक्स लिमिटेड , १९६६ साली स्थापन झालेली कंपनी. कुटुंबनियोजन इतर साधनांच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी स्थापन झालेली कंपनी.
ISRO ( इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ) ची स्थापना १९६९ मध्ये अंतराळ विज्ञानात आत्मनिर्भर होण्यासाठी झाली.
CCL ( सेन्ट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड ) ची स्थापना १९७५ मध्ये भारताला कोळश्याच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी झाली.
NTPC ( राष्ट्रीय औष्णिक विद्युत कॉर्पोरेशन ) ची स्थापना १९७५ मध्ये विद्युत निर्मिती मध्ये भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी झाली.
१९७६ मध्ये तेलशुद्धीकरण करणाऱ्या कंपन्या राष्ट्रीयकृत झाल्या भारताला इंधन पुरवठ्या मध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी.
GAIL ( गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ) ची स्थापना १९८४ मध्ये नैसर्गिक वायू उत्पादनात भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी झाली.
CDOT ( सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स ) ची स्थापना १९८४ मध्ये दूरसंचार क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आत्मनिर्भर होण्यासाठी झाली.
पवनहंस १९८५ साली ओएनजीसी सोबत ओएनजीसी ला हेलिकॉप्टर सेवा देण्यासाठी स्थापन झालेली कंपनी , २०१८ पर्यंत कायमच नफ्यात असणारी कंपनी.
या सगळ्या आत्मनिर्भर होण्याच्या प्रवासाची सुरुवात भारतीय प्रजासत्ताकाच्या जन्मापासूनच झालेली आहे.
मागच्या सत्तर वर्षात १०० पेक्षा जास्त संस्थांची उभारणी झालेली आहे ज्यांनी देश उभा केलाय.
मागच्या सत्तर वर्षाच्या काळातल्या उभारलेल्या कंपन्या विकूनच तुम्ही आता आत्मनिर्भर होऊ पाहताय ना ?
जेवढ्या जेवढ्या म्हणून कंपन्या विकून, निर्गुंतवणूक करून नोटाबंदी आणि जीएसटी ने केलेले खड्डे भरायला पैसे उभारलेत त्या सगळ्या कंपन्या मागच्या सत्तर वर्षातच उभ्या राहिलेल्या आहेत.
मात्र यावर कळस चढवला आहे तो तुम्हीच.
बीएसएनएल बुडवून कोण आत्मनिर्भर होणार आहे ?
बीपीसीएल विकून कोण आत्मनिर्भर होणार आहे ?
बीईएमएल विकून कोण आत्मनिर्भर होणार आहे ?
एचएएल पांगळ करून नेमक कोण आत्मनिर्भर होणार आहे ?
कोळसा खाणीच्या वापराचा एकाधिकार सरकारने सोडून देऊन नेमक कोण आत्मनिर्भर होणार आहे ?
आयआयटी मध्ये शेणमुत्र संशोधन करून कोण आत्मनिर्भर होणार आहे ?
एचएलएल , पवनहंस विकून कोण आत्मनिर्भर होणार आहे.
सरकारी कंपन्यांच्या सीएसआर मधून ३००० कोटींचे पुतळे बांधायचे ,
या सगळ्या कंपन्या विकून आलेले पैसे गोळा करून लोक ऑक्सिजन वाचून तडफडत मरताना २२००० कोटींचा राजमहाल बांधायचा,
पीएम केअर्स मध्ये भाबड्या विश्वासाने सामान्य लोकांनी टाकलेले पैसे भामट्या कंपन्यांना देऊन भंगार व्हेंटिलेटर खरेदी करायचे,
हेच सगळं लोकांना ,देशाला बुडवणे तुमचं आत्मनिर्भर होणं असेल आणि अच्छे दिन असतील तर,
काकाजी,
आम्ही जसे आहोत तसेच बरे आहोत, आम्हाला आमचे २०१४ पूर्वीचे दिवसच चांगले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत