
अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला आहे.भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. यामध्ये २०५३ नागरिकांचा मृत्यू झाला आहेत तर ९००० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.सुमरे ३५ गावांना भूकंपाचा फटका बसला आहे. शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असून मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी तेथील नागरिक प्रयत्न करताना दिसत आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहराच्या वायव्येस ३५ किलोमीटर (२० मैल) अंतरावर होता. भूकंपानंतर मोठ्या वेगाने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.अफगाणिस्तानात भूकंपानंतर जखमी झालेल्या नागरिकांच्या उपचाराची व्यवस्था जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत