भाजप ( बीजेपी ) ला विरोध का ?

-दत्ता तुमवाड. 9420912209
आपल्या सर्वाना माहीत आहे की, बीजेपी आर एस एस या संघटनेची एक राजकिय शाखा आहे. त्यामुळे बीजेपी सत्तेत राहून आर एस एस चीच ध्येय धोरणे कार्यक्रम नीती राबवणार, त्या संघटनेच्या दिशा निर्देशानुसार वाटचाल करणार नव्हे करीत आहेच. 1925 पासून ही संघटना आपल्या देशात कार्यरत आहे. परकीय आर्य ब्राम्हणांनी या देशावर राज्य करण्यासाठी आटोकाट प्रयत्नात होते. गेली 90 वर्ष त्यांनी सत्ता काबीज करण्यासाठी अनेक युक्त्या केल्या.
पहिले काम केले ते हे की, त्यांनी त्यांच्या वैदिक धर्मास हिंदू धर्माचा मुखवटा (मास्क ) लावला. आणि हिंदू धर्माच्या मागील वैदिक धर्माच्या सार्या शोषणवादी प्रथा परंपरा सुरू केल्या, हिंदू धर्माच्या नावे, निसर्गप्रेमी, निसर्ग पूजक हिंदू माणूस, इथला मुळनिवाशी बहुजन 85 टक्के ओबीसी एस.सी., एस.टी. , मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी याना देव देवता, धर्म, उपासना, स्वर्ग, मोक्ष कर्मकांड, अंधश्रध्दा या पारलौकिक स्वप्ना च्या जाळ्यात अडकून ठेवले. यामुळे सत्यवादी, वास्तव वादी निसर्ग पूजक हिंदू हा आपला धर्म सोडून वैदिक ( ब्राह्मण ) धर्माचे पालन करू लागला. कारण भारता वर आक्रमण करून सत्ता ताब्यात घेऊन सत्तेच्या जोरावर यांनी नाव हिंदूचे च ठेऊन कृती मात्र वैदिक धर्माची सनातन धर्माची करून घेतली. या डावपेचात हे 15 टक्के यशस्वी झाले. आजही हे 15 टक्केच 85 टक्क्यावर म्हणजे बहुजनां वर राज्य करताहेत, त्यांचे आर्थिक सामाजिक राजकिय शोषण करीत आहेत. एव्हढे जरी आपणास कळले तरी नक्कीच आपण बीजेपी ला सत्तेत ठेवणार नाही. 2024 ला परत ती सत्तेत आली तर अजूनही आपण म्हणजे बाबासाहेब, गांधीजी यांनी आपणास मताचा हक्क अधिकार देऊनही अडाणीच राहिलो, असा संदेश जगात जाईल.
बीजेपी ला का विरोध ? याची कारणे पुढील प्रमाणे 1आर. एस एस. ही संघटना समतावादी नसून विषमतावादी आहे,
2 शोषण ( आर्थिक सामाजिक ), वर्चस्व ( हुकुमशाही ),श्रेष्ठत्व ( वर्ण जाती ),वंशत्व ( घराणेशाही ),लिंगत्व ( स्त्री पुरुष असमानता ) हे पाच मूल्य या संघटनेची आहेत, म्हणजेच बीजेपी चि पण आहेत.
3 म्हणुन मोदी हुकूमशाह सारखे वागतात. लोकसभेत चर्चा न करताच एकाच वेळी अनेक बिले मंजुर करून घेतात, त्यांना हवी तशी. एकाच वेळी 41 विरोधी खासदारांना निलंबित करतात. अध्यक्षा मार्फत.
4 निवडणूक आयोग, रिझर्व्ह बॅंक, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती, ईडी , सि आई डी ,न्यायालये अशा लोकशाही स्वायत्त संस्थांवर आपल्या मर्जीतील व्यक्ति नेमतात.
5 सामूहिक बलात्कार करणार्या व्यक्तिंना शिक्षा झाली असताना पण कोर्टातून मुदतपूर्व सोडवणूक करतात त्यांचीच माणसे त्यांचा भव्य सत्कार करतात, निर्लज्ज पणाचा कळस.
कुस्तीगीर खेळाडू महिलावर बीजेपी चा खासदार विनयभंग करतो खेळाडू जिंकलेले पदके परत करतात तरी त्यास अटक होत नाही.
6 लाखो शेतकरी आठ दहा महिने ठाण मांडतात, लाखो बेकार युवक रोजगार साठी आंदोलन करतात,कितीतरी वकील ईव्हीएम हटाव बायलट पेपर्स लाव ,म्हणुन धरणे धरतात, लाखो कर्मचारी,सैनिक जुनी पेन्शन साठी जंतर मंतर मैदानात सत्याग्रह करतात तरी ही सारी लोकशाहीची संघटनात्मक आंदोलने दडपून टाकतात, कित्येकांचा बळी घेतात.
7 भ्रष्टाचारी नेत्याना जेल मध्ये टाकण्याचे आश्वासन देऊन निवडून येतात ,सत्तेत आले की त्यानाच आसरा व पैसा पद देऊन सन्मान करतात,मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करतात.
8 आपल्या पक्षातील भ्रष्टाचारी नेत्याना ईडी न लावता फक्त विरोधी पक्षातीलच लोकाना लागतात.
9महागाई,बेकारी ,शेतकर्यांना हमी भाव ( msp) ,वाडी तांडे अनेक गावांमध्ये
“हर घर नल, नल मे शुध्द जल “.
ही त्यांची घोषणा, तसेच 2022 तक सबको मकान, ही त्यांची घोषणा,शेतकर्यांच उत्पन्न दुप्पट हे सारे फुसके बार सिद्ध झाले.गॅस सिलेंडर भाव 7 पट वाढविले,पेट्रोल डिझेल दुप्पट केले. शेतकर्यांच्या मालाला भाव कमी देऊन त्यांचे कडून 100 रुपये घ्यायचे आणि त्यांना 5 रुपये सन्मान म्हणुन द्यायचे ,विम्याचा पण धंदा च केला एकंदरीत सार्याच पातळीवर हे सरकार फेल आहे, असेच म्हणावे लागेल.
10 सर्व सामान्य जनतेत काहीच वाद नसताना किंवा जनतेचे मागणी नसताना, स्वातंत्र्य नंतर जुनी भांडणे उकरून काढू नये,सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता या तत्त्वाने घटनेचा आदर करून चालायचे हे निश्चित केले असताना पण या आर एस एस बीजेपी यांनी मंदिर मजीद वाद निर्माण केला,आणि देशात शांतता भंग केली. हिंदू मुस्लिमा मध्ये तेढ निर्माण केला. सामाजिक ऐक्य, आणि देशाची अखंडता बिघडविनार्याना धडा शिकवलाच पाहिजे.
11 काँग्रेसनं मिश्र अर्थ व्यवस्था चे धोरण स्विकारलेल होत म्हणुन त्यांनी खाजगी व सरकारी कारखाने, शेती, सेवा, व्यावसाय ,शिक्षण आरोग्य अश्या प्रत्येक क्षेत्रात दोन्ही सेक्टर कार्यरत ठेवले. परंतु बीजेपी फक्त खाजगीकरण यास प्राधान्य देत आहे. म्हणुनच मोदींनी सरकारी विमानतळ विमाने, रेल्वे कारखाने कंपन्या,शेती, गाय रान अंबानी अदानी ना विकले.फायद्यात चालणारे पण विकले. खनिजे विकली. जंगले विकली. शाळा दवाखाने रस्ते विकले. जनतेच्या मालकीचे काहीच ठेवले नाही. मुनीम गब्बर आणि मालक भिकारी, अशी अवस्था मोदींनी केली.
12 जनतेचा आवाज असणारे वृत्तपत्र, टीव्ही, ही माध्यमे सुद्धा विकली. यांचेवर नियंत्रण ठेवले.
13 सरकारच्या बीजेपी विरोधी बोलणार्याला देशद्रोही ठरवून हकनाक त्रास देणे,जेल मध्ये टाकणे सुरू केले. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला.
14 सार्या स्वयंसेवि सेवाभावी संस्थांचे फंड बंद केले,त्यांचे काम कार्य बंद पाडले. 15 जाती धर्मात प्रवर्गात भांडणे लावली.आसाम मध्ये कुकिं आणि मै ती या दोन जातीत भांडणे लावली. कुकी जातींच्या लोकांची घरे पेटवली, महिलांवर अत्याचार केल,नग्न धिंड काढली,एक महिना आसाम जळत होते पण मोदी त्यावर एक शब्द बोलले नाहीत. दुःख तर नाहीच.
16 महागाई बेकारी यावर लोकानी मोर्चे काढू नयेत म्हणुन राममंदिर चा मुद्दा लाऊन धरला.
17 इतर पक्षांची, जनतेचे मागणी नसताना पण हजारो कोटी खर्च करून एक असताना दुसरे लोकसभा भवन बांधले. त्याच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना ना बोलविता आर एस एस प्रमुख मोहन भागवतला बोलविले.
18 आर एस एस ही एक दहशत वादी हिंसक सामाजिक ऐक्य बिघडवनारी लोकशाही विरोधी संघटना आहे. यांनी या देशाच संविधान मान्य नाही, म्हणुन जाळले, तिरंगा मान्य नाही म्हंटले, हे सत्तेतील सरकार मान्य नाही म्हंटले 1947 साली. गांधीजींचा खून केला,स्वातंत्र्यानंतर ही अनेक बॉम्बस्फोट केले, म्हणुन या संघटनेवर तीन वेळा सरकारने बंदी आणली होती, शेवटी हे स्वातंत्र्य, हे संविधान,ही लोकशाही,हे सरकार आम्हाला मान्य आहे “.असे लेखी लिहून घेऊन यांचे वरील बंदी उठवली. अशी बीजेपी चि पार्श्वभूमी आहे. असे असले तरी अजूनही ते त्यांचा अजेंडा राबवत आहेत. सत्तेत असल्याने तर उघड बोलताहेत की ” आम्हाला संविआमचे संविधान हे मनुस्म्रती च आहे. नथुराम हा देशभक्त च आहे. धार्मिक राष्ट्रवाद आम्ही मानतो. राष्ट्रीय किंवा सामाजिक राष्ट्रवाद आम्हाला मान्य नाही “.असे उघड उघड त्यांचे काही खासदार आणि हिंदुमहासभेचे आणि बजरंग दलाचे लोक बोलताहेत. भिडे गुरुजी जाहीर सभेत बोलताहेत. बीजेपी सत्ता 1914 ला आली, म्हणुन भारत स्वातंत्र 1914 लाच झालाय. असे पण बोलून दाखवताहेत. ही सर्व पार्श्वभुमी आणि कारणे लक्षात घेऊन बीजेपी आता नको. असाच या लोकसभेचा कौल जनतेने देणे आवश्यक आहे.कोणत्याही पक्षाच्या उमेदवारास मत द्या.पण बीजेपी ला पाडा. इंडिया आघाडीच सत्तेत आली पाहिजे. असा संकल्प करु या. – लेखक:
दत्ता तुमवाड. 9420912209
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत