
नागपूर : बसपाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत राज्यभरातील विधानसभेच्या सर्व २८८ व लोकसभेच्या सर्व ४८ जागांचा संघटनात्मक आढावा घेतला जात आहे. यातही जिंकण्याच्या दृष्टीने विधानसभेच्या २५ व लोकसभेच्या ७ जागांवर लक्ष केंद्रीत केले असल्याची माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजणे यांनी शनिवारी रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अॅड. संदीप ताजणे यांनी सांगितले, बसपाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यभरात पक्षाचा संघटनात्मक आढावा व कार्यकर्ता मेळावे घेतले जात आहे. पक्षाचे केंद्रीय प्रभारी राजभर हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून नागपूर जिल्ह्याचा आढावा घेत आहेत. १६ तारखेपासून विधानसभा निहाय आढावा व कार्यकर्ते मेळावे घेतले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात बुथ स्तरीय आढावा घेतला जात असून बुथ अदिक मजबूत करण्यावर भर दिला जातोय. कार्यकर्त्यांना अधिकाधिक जबाबदारी दिली जात आहे. बुथ स्तरावरच्या कमिट्या तयार केल्या जात आहे. यातून पक्षाचे संघटन अधिक मजबूत केले जात आहे. बसपा सध्या तरी स्वबळावरच लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत