भिवंडी येथील गौरीपाडा भागात इमारत कोसळून आठ महिन्यांच्या मुलीसह दोखांचा मृत्यू

ठाणे – एक मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर पाच जणांना वाचविण्यात आले. मृतांमध्ये एका आठ महिन्यांच्या मुलीचा समावेश आहे. उझमा आतिफ मोमीन (४०), तस्लिमा मौसर मोमीन (८ महिने) अशी मृतांची नावे आहेत.
गौरीपाडा येथील साहील उपाहारगृह परीसरात अब्दुल बारी मोमीन मजली इमारत होती. रविवारी मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सात जण अडकले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी अग्निशमन दल आपत्ती प्रतिसाद दल घटनास्थळी दाखल झाले. पथकांनी ढिगाऱ्यात अडकलेल्या सर्व व्यक्तींना बाहेर काढले. परंतु यात उझमा आणि तस्लिमा यांचा मृत्यू झाला होता. मध्यरात्री ३.३० वाजता येथील बचाव कार्य थांबविण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत