महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसामाजिक / सांस्कृतिक

“धम्मकारण समाजकारण आणि राजकारण “

  • भाग 2

मला समाजाची गरज नाही,
समाजामुळे माझं काय अडत नाही, असे अहंकाराने बोलणारे अनेकदा दिसतात तर
त्याहून भयानक समाजातील घटकाला चुकीबद्दल जाहिररित्या मानहानी करून समाजातील लोकांना वाळीत टाकणारे.

अशा उच्चर्भुत तत्वज्ञानी, महामाग विचारवंतांसाठी हा दुसरा भाग.

????????प्रथम समाज कसा निर्माण झाला ?
ते समजून घेऊ.

मानवी उत्क्रांती दरम्यान हिंस्र पशू – परशत्रूपासून संरक्षक, सामाईक अन्न मिळविण्यासाठी निर्माण केलेला समूह.

कालांतराने अग्नी चा शोधानंतर मानवी जिज्ञासू वृत्ती प्रबळ होत असताना होणा-या दैनंदिन बदल घडत असताना भौगोलिक अभ्यासात एकविचारी समुह व्यवस्था आणि त्याला दिशा दर्शवणारी _परंतु, बहुमताने स्विकारणारी नेतृत्व प्रणाली निर्माण झाली.
त्याला सर्वांना एकत्रित राखण्यासाठी नियमावली बांधली गेली. त्यामुळे एक शिस्तबध्दता प्रवाहित राहिली. कार्यप्रणाली संघाटनात्मकरित्या कार्यरत होत गेली.
ह्याच समुहाला समाज म्हणून गणले गेले.

????????समाज का महत्वाचा आहे ?

समूहामध्ये राहिल्याने सर्वप्रथम शिष्टाचार, आदर्शमय व्यक्तिमत्व, प्रतिष्ठा, मुबलक अन्न व्यवस्था, पारिवारिक सुरक्षितता, विकासात्मक धोरण, व्यावसायिक आदान प्रदान व्यवस्थेतून विदेशी मैत्री संबंध आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सामाजिक संघटनामुळे अकस्मात संकटातून सुटका होण्यास‌ मदत होते. म्हणून व्यक्तिगत जीवनाबरोबर समाजाबरोबर राहणे, प्रत्येक मानवास हिताचे ठरले.

“आधुनिक काळात समाजात होणारे बदल आणि त्याचे विपरीत होणारे परिणाम”

बदलत्या काळानुरूप समाजातील नियमांमध्ये रुढी, परंपरामध्ये कट्टरता, स्वामित्वाची भावना, मोठेपणा मिळवण्याच्या चढाओढीच्या स्पर्धांमुळे काळानुरूप समाजात गटतट पडून समाज दुभंगत होत गेला.

समाजाने संघटनात्मक भुमिकेसाठी लावलेले नियम स्वार्थापोटी तोडत हवे तसे हवे तेव्हा वागू लागले.
त्यामुळे लोकांमध्ये समाजातील संघटनात्मक राहण्याची भावना दुसरत होत गेली आणि समाजविरहीत वर्ग वाढत गेला.
एका पिढीकडून दुस-या पिढीपर्यंत समाजाशी बांधिलकी बाळगणारे बदलत्या युगातील समाजघातक विचारातून आजची पिढी पुर्णपणे समाजापासून विलप्त झाली.
परिणामी आपली समाज संस्कार घडवणारी संस्कृतीचा कोणताही अभ्यास न मिळाल्याने इतर वर्गाच्या समाजातील इव्हेंट मध्ये अधिकाधिक आकर्षक चालली पिढी मोठ्या प्रमाणात दिसू लागली.
स्वतः च्या समाजाच्या मुळ संस्कृतीला बाजुला सारत
इतर समाजातील संघटनात्मक धोरणामध्ये अधिकाधिक समावेश करत स्वतः ला इतरांच्या समाजातील घटक म्हणून स्वतः ला समजू लागला.

परंतु, काही वर्चस्ववादी वर्ग इतर वर्गातला आपल्या समाजात समाविष्ट होऊन आपले वर्चस्व हिरावून घेईल,
ह्या विचाराने तिरस्कार करून अपमानजनक वागणूक देण्यास सुरवात केली.
त्यामुळे समाजा – समाजामध्ये अराजकता माजत गेली.
त्याचे विपरीत परिणाम आज भारत देशाच्या अखंडतेला तडा निर्माण होत आहे.
शेवटी आयुष्यभर इतर समाजात वावरणाऱ्याचे अस्तित्व संपले किंवा अन्यायकारक घटना घडल्या किंवा समाजातील सुखसुविधांचा लाभ घेण्याच्या प्रसंगी मुळ समाजाकडे परततो,
तेव्हा मात्र स्वत:च्याही समाजाच्या तिरस्काराला सामोरे जावे लागते.

म्हणून स्वत:चा स्वार्थ, अहंकार, इतरांविषयी व्देष भावना बाजुला सारून समाजातील संघटनात्मक वृत्ती जन्मापासूनच आपल्यापासून भावी पिढीला समाजाचे महत्व जाणणे अधिक महत्वाचे ठरते.

????????समाज एकनिष्ठ आणि एकजुट राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना कशाप्रकारे करता येईल ?

आपल्याच समाजातील एखादा चुकत असेल म्हणून त्याचे जाहिररित्या मानहानी न करता व्यतिगतरित्या समजावून आपल्या समाजात आपला बांधव कसा आपला राहील, ह्यावर अधिक प्रक्रिया होणे आवश्यक.

तसेच, वेळोवेळी समाजातील विविध समस्या उदाहरण बालसंस्कार, शैक्षणिक विकास, करियर गाईडस्, व्यक्तिमत्व विकास शिबीर, आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न, शासकीय निमशासकीय स्पर्धा परीक्षा यांच्यासह कौशल्य विकास प्रशिक्षण, नोकर – व्यवसायासह वैद्यकीय मदत, अन्यायाचा बिमोड करणारा कायदा अभ्यासासह आपत्कालीन परिस्थितीत तत्पर मदतकार्य अशा विविध माध्यमातुन समाजाला वेळोवेळी एकत्रित राखण्यासाठी जर सातत्याने प्रयत्न केला तर समाजातील घटक इतर वर्गाकडे वळू शकणार नाही आणि
समाजाच्या उन्नतीसाठी नेहमी तत्पर राहिल.

नुसते प्रश्न उभे करण्याऐवजी,
आपल्या समाजाचे जाहीररित्या धिंडवडे काढण्याऐवजी निर्माण होत असलेल्या प्रश्नांवर स्वतः पुढाकार घेऊन स्वतः पासून उपाययोजना सुरु करणे,
अधिक महत्वाचे.

आपला समाज वाईट आहे,
समाजातील लोक वाईट आहेत,
असे बोलून समाजातील स्वतः ची जबाबदारी झटवणे,
हे षंढपणाचे लक्षण आहे.
कारण बोलताना बोलणारा विसरून जातो की,
तोही समाजाचा एक घटक आहे,
जर आपल्या समाजात चुकीचे काही घडत असताना वाटत असेल तर प्रत्यक्ष स्वतः ला उतरून ती निर्माण झालेली समस्या सोडणे गरजेचे आहे,
त्याचबरोबर पुन्हा समस्या निर्माण होणार नाही याची कायमस्वरूपी उपाययोजना करणे,
तितकेच महत्वाचे.
आपल्या समाजाचे खच्चिकरण करण्यापेक्षा वेळोवेळी माणुसकी आणि मदतीचा हात द्यायला शिका.
शेवटी आजच्या काळात एकजुटीने समाजाशी निगडित राहिलो तर आपले अस्तित्व राहील.
अन्यथा कोणीतरी बाहेरून आपल्या समाजाला दुभंगत राहिल आणि वर्चस्व गाजवेल.

हे समाजकारण होणे, आज काळाची गरज आहे.

दक्ष रहा.
सावध रहा.
भारत देशाच्या अखंडतेला तडा जाऊ देऊ नका.
कारण आपण भारतभूमीत जन्मलो.
म्हणून आपण प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय राहणार.

✍????आपला दक्ष बंधु,
आयु. जितेंद्र स. कांबळे गुरुजी
_संस्थापक, अध्यक्ष,
आम्रपाली सेवाभावी संस्था, मुंबई (रजि.) ;
मुक्त वार्ताहर,
आधार पत्रकार संघ.
धम्म संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!