महाराष्ट्र सर्वाधिक भ्रष्टाचार असलेल्या राज्यांच्या यादीत तिसऱ्यांदा प्रथम

लाच प्रकरणे : महाराष्ट्र – ७४९, राजस्थान – ५११, कर्नाटक – ३८९ , मध्य प्रदेश – २९४, ओडिशा – २८७
महाराष्ट्र भ्रष्टाचारात सलग तिसऱ्या वर्षीसुद्धा देशात पहिल्या स्थानावर आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असलेल्या राज्यांची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वाधिक ७४९ लाच प्रकरणांत कारवाई केली आहे.
महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शासकीय विभागावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस विभाग, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक लाच मागितल्याची प्रकरणे समोर आली आहेत. देशात महाराष्ट्रानंतर दुसऱ्या स्थानावर राजस्थान (५११), तिसऱ्या स्थानावर कर्नाटक (३८९) आहे. एसीबीने दाखल केलेल्या प्रकरणांपैकी तब्बल ९४ टक्के प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यासाठी न्यायाधीशांची कमतरता, एसीबी अधिकाऱ्यांची मानसिकता कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत