मुख्यपानविचारपीठसंपादकीय

बौद्ध धर्मातील मूर्ती पूजा

रविंद्र मिनाक्षी मनोहर


बुद्धाच्या हयातीत भगवान बुद्धांनी प्रत्यक्ष कृती ला महत्व दिले. पूजा पाठ हे केवळ व्यर्थ आहेत असे स्पष्ट भूमिकाच बुद्धांची आहे. उदाहरण द्यायचे झाले तर नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी आपल्याला चालावे लागेल पोहावे लागेल किंवा नावेने जावे लागेल पण आम्ही म्हणत असू कि मी पूजा पाठ करतो उपास तापास करतो पण तो किनारा माझ्याकडे चालत आला पाहिजे तर ते शक्य नाही हे प्रत्येक जन समजतो. बुद्धाने नेमके तेच सांगितले कि पूजा पाठ फक्त तुमचे मानसिक समाधान करू शकतात.
परंतु याच बुद्धांच्या एवढ्या मुर्त्या कां निर्माण झाल्या? आणि प्रत्येक विहारात बुद्धाच्या मूर्ती ची पूजा का केली जाते ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडणार स्वाभाविक आहे.

अखेर बुद्धाची पूजा का करू लागले लोक जाणून घेवू या.
बुद्धांच्या महापरिनिर्वाण झाल्यावर बुद्धांनी निर्माण केलेला हा विराट भिक्खू संघ नेतृत्व गमावून बसला होता. यावेळी बुद्धांनी आनंदाला जे सांगितले होते कि माझ्या नंतर धम्म हाच तुमचा शास्ता आहे आणि त्यानुसार च तुम्ही सर्वांनी चालावे आणि त्याच प्रमाणे बुद्धांच्या नंतर इथे कोणी हि बुद्धाची जागा घेण्यास तयार झाला नाही किंबहुना तेवढी उंची कोणाची निर्माणच झाली नाही. आजवर सम्यक संबुद्ध कोणी हि झालेला नाही हे वास्तव आहे. बुद्धाच्या महापरिनिर्वाण नंतर बुद्धाच्या शरीर धातूंचे जतन करण्यात आले. प्रथम त्यांच्या या शरीर धातूवर आठ शारीरिक स्तुपांची निर्मिती करण्यात आली आणि ज्यांनी आपल्याला हा दुःख मुक्तीचा मार्ग दिला आहे अश्या तथागत बुद्धांच्या स्मरणार्थ प्रथम स्तूप पूजा सुरु झाली. कालांतराने बौद्ध लेण्यांची निर्मिती झाली. लेण्यामध्ये पुढे प्रार्थनास्थळ निर्माण झाले. आणि शारीरिक स्तुपांची जागा उद्देशिका स्तूप निर्माण झाले. भिक्खू संघाने बुद्धाचे अस्तित्व म्हणून बुद्ध प्रतीकांची निर्मिती केली आणि त्या द्वारे बुद्धाची शिकवणीचा प्रचार आणि प्रसार सुरु केला. सुरुवातीचे बुद्ध प्रतीकांची पूजा होत असे त्यामध्ये स्तूप, बोधिवृक्ष , त्रिरत्न अश्या र प्रकारे बुद्धाचे स्मरण केले जात असे.
बुद्धाची पूजा काही मागण्यासाठी केली जात नसे किंवा काही मिळवण्यासाठी किंवा काही तरी मागणी करण्यासाठी केली जात नसे. बुद्ध पूजा हि बुद्धाचे स्मरण करण्यासाठी केली जात असे. ज्या महामानवाने आम्हाला दुःख मुक्तीचा मार्ग दिला ज्यामुळे आम्ही आमच्या जीवनातील दुःख दूर करून निर्वाण पद प्राप्त करू शकतो ह्या भावनेने बुद्धाची पूजा होत असे. प्राचीन काळापासून ते आज पर्यंत कधी बुद्धाच्या शिल्पला पुष्पमाला अर्पण केली जात नाही किंवा घातली जात नाही. केवळ पुष्प अर्पण केले जाते.
इसवी सन पूर्व पहिले शतक हे बुद्ध मूर्तीच्या निर्मितीचे शतक म्हणून पहिले जाते.म्हणजे बुध्दाच्या म्रुत्युनंतर जवळपास ४५० वर्षांनीसम्राट कनिष्काचा काळात बुध्द मुर्तीची निर्मिती झाली. भारतात पहिल्यांदा बुद्ध मूर्ती निर्माण करण्यात आली ती गांधार शैली मध्ये होती. आज राष्ट्रपती भवनाची शान हि गांधार शैली मधील भगवान बुद्धाची मूर्ती आहे. हि मूर्ती पूजनासाठी निश्चित नव्हती तर बुद्धाचे अस्तित्व सांगणारी मूर्ती होती. आपल्या आदर्शाला वंदन करणे हि प्राचीन सभ्यता आहे याचा अर्थ असा नाही कि त्याच्याकडून काही मागणी केली जाते. तसेच बुद्धाच्या मूर्ती ची निमिती झाल्यावर पुढे ते बुद्ध पूजा पाठ संस्कार निर्माण करण्यात आले. संस्कुती आली कि त्याचे संस्कार आलेच आणि प्रत्येक माणसावर हे संस्कार रुजवणे आवश्यक असते. बुद्धाच्या शिकवणीला प्रत्येक माणसाच्या आचरणात आणण्यासाठी बौद्ध संस्कार पद्धतीचा उगम झाला आणि प्राचीन विहारात कालांतराने बुद्धाच्या मूर्तीची स्थापना झाली. बुद्धाच्या शिकवणीला लोक अनुसरण करू लागले आणि त्यासाठी प्राचीन काळात विहारांची निर्मिती झाली जिथे प्रत्यक्ष धम्म शिकवला जात असे. दुःख काय आहे , दुःखाची कारणे काय आहेत, त्यावर कसे मार्ग आहेत अश्या अनेक गोष्टी केवळ सांगून होत नाही किंवा त्याचे पठन केल्याने त्याचा आपल्या आयुष्यात प्रभाव पडेल असे अजिबात नसते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले पाहिजे आणि हीच गोष्ट बुद्धाच्या मूर्ती समोर शिकवली जात असे. त्यामुळे लोकांचे विहारात येणे होत असेल लोक एकत्र आल्याने एकत्रित धम्म अध्ययन करत असत. ज्यामुळे बुद्धाचे शिल्प हे एक उदाहरण असे कि , बुद्धासारखे होण्यासाठी बुद्धांनी दिलेल्या मार्गाचे पालन करणे आवश्यक आहे.

बुद्ध मूर्ती ची पूजा हि कोणतेही कर्मकांड मानून केली जात नाही किंवा बुद्धाकडून काही मागितले हि जात नाही आणि बुद्ध स्वतः सांगतात कि मी फक्त मार्ग सांगू शकतो प्रत्यक्ष मात्र तुम्हालाच त्यावर चालायचे आहे. त्यामुळे आज हि भारतातच नव्हे तर जगभरात असलेल्या बुद्ध विहारातील मूर्ती समोर कोणी हि बुद्धाकडून काही हि मागणी करत नाही कारण सर्वाना माहिती आहे कि बुद्ध हा केवळ मार्ग दाता आहे आणि त्याने दिलेला मार्ग आपल्याला प्रत्यक्ष चालायचा आहे.
बुद्ध शिकवण हीच बौद्ध धर्माचा अधिकृत शास्ता आहे अधिकारी आहे मालक आहे. शिकवणीला अनुसरून चालणाराच निर्वाणाकडे जातो. इतर कोणी हि तिकडे पोहचू शकत नाही. बुद्ध हि मूर्ती म्हणजे पूजेसाठी निर्माण केलेले माध्यम नसून प्राचीन काळातील एक साहित्य देखील आहे. भगवान बुद्धाच्या मूर्ती ज्या प्राचीन काळातील निर्माण झाले आहेत त्या मुर्त्यांचे एक विशेष वेगळेपणा आणि अर्थ आहे. बुद्धांच्या प्रत्येक मूर्ती मध्ये बुद्ध हे धम्म चक्र प्रवर्तन मुद्रे मध्ये सापडतात किंवा ध्यानी मुद्रेत सापडतात. हा बुद्धाच्या शिकवणीचा एक मोठा इतिहास सांगणारी साधने आहेत.लेणी असो कि स्तूप असो किंवा विहार प्रत्येक ठिकाणी बुद्धाच्या अनेक मुद्रा कोरलेल्या आपणास पाहायला मिळतात त्यामध्ये धम्मचक्र , ध्यान , भूमिस्पर्श , वरद , करण, वज्र, वितर्क, अभय उत्तर बोधी आणि अंजली अश्या एकूण ९ ते १० मुद्रा आपणास पाहायला मिळतात. ह्या प्रत्येक मुद्रेमध्ये बुद्धाच्या जीवनातील घटनांशी सबंध आहे इथे कोणती मुद्रा बुद्धाच्या जीवनातील घटनेला सोडून नाही आणि यापैकी इतर कोणत्या हि मुद्रेत बुद्धाची मूर्ती सापडत नाही.
तथागत बुद्धाच्या नंतर बुद्धाच्या भिक्खू संघाचे देखील विभाजन झाले. परंतु दोघांचा मार्गदाता हा एकच होता. बुद्धाच्या नंतर १०० वर्षांनी कालासोक यांच्या काळात दुसरी धम्म संगती झाली ज्यामध्ये वज्जी चे भिक्खू आपल्या काही मागण्यासाठी वेगळे झाले. आणि महासांघिक नावाने आपला संघ निर्माण केला. पुढे महायान मध्ये रुपांतर झाले आणि हि पूजापाठ चालत राहिले कालांतराने भिक्खू संघात सामील होत गेलेले अनेक भिक्खू नि आपले पंथ निर्माण केले आणि पुढे वज्रयान हा पंथ निर्माण झाला पुढे त्यामध्ये तंत्रयान हि निर्माण झाले. आणि कालांतराने बुद्धाच्या मूर्ती पूजेत बदल निर्माण झाले पुढे भारतातून बौद्ध धर्माची पीछेहाट झाली इस्लामी आक्रमण कर्त्यांनी बुद्धाच्या मुर्त्यांचे तोडणे भिक्खुंच्या कत्तली केल्या.परंतु बौद्ध धर्म जगातील इतर राष्ट्रात स्थापित झालेला होता. बौध्द धम्म भारतातून लुप्त झाला.नंतर बौद्ध धर्मात वज्रयान पंथाने निर्माण केलेल्या देवता इतरांच्या देवता म्हणून पुजाण्यास सुरुवात झाली .
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा देवून या देशात पुन्हा बौद्ध धर्माचे पुर्नस्थापना केली आणि जो बुद्धाने सांगितलेला धम्म पुन्हा दिला त्यामुळे आज वर्तमान काळात अनेक मोठी विहारे भारतात निर्माण झालेली पाहायला मिळतील. प्रत्येक विहारात तुम्हाला बुद्ध हा मूर्ती स्वरुपात सापडेल पण कर्मकांड किंवा काही तरी मागण्यासाठी त्याच्यापुढे नवस बोलण्यासाठी त्या मूर्तीचा वापर केला जात नाही तर बुद्धाचा हा दुःख मुक्तीचा मार्गावर आम्ही अखंडपणे चालत राहिलो पाहिजे यासाठी सर्व लोक बुद्धाला नतमस्तक होतात कि तुमच्या आदर्श गुणांचे आम्ही देखील संपादन करू.
विहारातील बुद्ध मूर्ती हि शांतीचे प्रतिक असते आज असंख्य श्रीमंतांच्या घरात हि बुद्ध मूर्ती सर्रास पाहायला मिळते ती शांतीचे प्रतीक म्हणून कारान शांती कशी मिळते ह्याचा कृतीशील मार्ग या जगात फक्त भगवान बुद्धाने दिलेला आहे.

धन्यवाद

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!