
भारताचे नाव काय असावे यासाठी संविधान सभेमध्ये विस्तृत चर्चा तसेच विविध वाद विवाद झाले
भारताचे नाव काय असावे यासाठी संविधान सभेमध्ये विस्तृत चर्चा तसेच विविध वाद विवाद झाले परंतु डॉ बाबासाहेबानी India, that is, Bharat असे नाव सुचवले परंतु कामात यांनी ‘India that is Bharat’ हे नाव बदलून हिंदीत ‘भारत’ म्हणावं आणि इंग्रजी भाषेत ‘इंडिया’ म्हणा आणि ते ‘राज्यांचे संघराज्य’ असे सुचवले परंतु कुणाचेही एकमत झाले नाही म्हणून या ठरावावर मतदान झाले . या ठरावाच्या बाजूनं 38 तर विरोधात 51 मतं पडली. ठरावाच्या विरोधात मतदान झालं. त्यामुळे कामत यांचा प्रस्ताव बारगळला त्यामुळे ‘India that is Bharat’ हे नाव निश्चित करण्यात आले . कलम 1 मध्ये “इंडिया, म्हणजे भारत, ‘राज्यांचा संघ’ असेल” असा उल्लेख करण्यात आला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाला अंतिम रूप देण्यात आलं आणि घटना समितीने राज्यघटना स्वीकारली. 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत