भीम जयंती विश्लेषण वास्तविकता.

डॉ विलास जोंधळे.
सत्य व कटू आहे पण वाचा………
वर्षातील 364 दिवस ज्यांचा आंबेडकर चळवळीशी काडीमात्र संबंध नाही असे भीम जयंतीला आपण किती आंबेडकरवादी आहेत हे उर बडऊन सांगत असतात.
आंबेडकरी चळवतील समाज हा त्यांना पाहतो आणि ओळखतो हे वास्तव आहे.
वर्षातील 364 दिवस विषमतेला पोषक काम करणारे विषमता बळकट करण्यासाठी दिवसरात्र काम करतात. एक दिवस भीम जयंतीच्या दिवशी येऊन आम्ही किती प्रामाणिक आणि मोठे आंबेडकरवादी दाखवण्यासाठी काम करताना हिर हिरीवेने पुढाकार घेताना आपल्याला दिसतात.
भीम जयंतीला येऊन इव्हेंट करून मोमेंट करता येणार नाही. कारण किती दिवस आंबेडकर चळवळीशी धोका देणार आहात.
जे वर्षातील 365 दिवस प्रामाणिकपणे दिवसरात्र आंबेडकर चळवळ मजबूत करण्याचं काम तळागाळात जाऊन, रूट लेवल ला जाऊन, समाज प्रबोधन करून बाबासाहेबांचे विचार शेवटच्या माणसापर्यंत नेण्याचा जे कार्य करीत आहेत तेच खरे आंबेडकर वादी आहेत. त्यांना माहिती आहे की काही पाखंडी पोटभरू, स्वार्थापोटी, आलेले नवटंकी यांना आंबेडकरी चळवळीतील समाज ओळखतो.
महापुरुषांच्या पुतळ्याचे दैवतीकरण थांबूया. पुतळ्याच्या त्या ठिकाणी पुष्पहार विकणारे बसतात. जसे मंदिराच्या जवळ बसतात त्याप्रमाणे तिथे काहींनी दुकान थाटले आहे.
प्रत्येकानी हार घालून विचाराची
हार तर करत नाही ना, याचा विचार करावा लेगेल.
पुष्प हारावरील खर्च
वाचूया.
वस्तीतील गरीब विद्यार्थ्यांना स्वतः जावून वही पेन अभ्यासाचे साहित्य वाटप करावे.(काहींनी स्वार्थासाठी वही पेन ची दुकाने थाटली तर नाही ना अश्याना ओळखा)
मोमेंट साठी कॉन्टिटी नाही तर कॉलिटी ची गरज असते.
करनी आणि कथनी
चळवळीसाठी फार महत्त्वाची असते.
जे दररोज विचार बदलतात ते कधीच प्रामाणिक होऊ शकत नाही.
भारतीय संविधानातून आम्हाला शिक्षण व नोकऱ्या मिळाल्या. आम्ही त्या मिळवल्या व आमच्या कुटुंबातच आम्ही मश्गूल राहिलो. बाजूला वळून सुद्धा पाहाण्याची गरज आम्हाला वाटली नाही.
कधी आमचे पाये बुद्ध विहारा कडे वळलीच नाही.
कधी आमची पाये आमच्या समाजातील वस्तीकडे वळालीच नाही.
कधी त्यांचे दुःख, वेदना आम्ही जाणून घेतल्या नाही .
तरीपण भाषणात व स्वतःच्या समारंभात जसे बर्थडे , लग्न , गृहप्रवेश , निरोप संभारंभ,असेल अशा कार्यक्रमात हे असे दाखवतात आम्ही सर्व समाजाला मदत करतो व आम्हीच आंबेडकरवादी आहोत.
पण समाजातील खरे आंबेडकर अनुयायी मोठ्या मनाने माफ करतील .
म्हणावं वाटतं
बाबांच्या लेकरांनो घर हे सोडू नका ,
भिमाची आज्ञा मोडू नका .
सैनिक हो भिमाचे भीमराव आठवारे, चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक व्हा रे .
सबेरेका भुला आगर शाम मे वापस आता है तो उसे, भुला नही कहते .
आई जशी मुलांना माफ करते तशी आंबेडकर चळवळ तुम्हाला माफ करेल. या प्रामाणिकपणे कार्य करा आणि बाबासाहेबांच्या विचारासाठी चळवळीला साथ द्या. सोबत कार्य करा तरच खऱ्या अर्थाने माफी राहील.
अन्यथा जनावरात आणि माणसात फरक आहे हे समजून घ्या.
पेनाचे हात शेना कडे नेवु नका.
चला प्रबुद्ध भारत घडवूया .
चला भारतीय संविधानाला वाचवूया.
चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भारतातील शेवटच्या माणसापर्यंत नेऊया. डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असा समाज घडवूया .
ह्या जयंतीला भावनिक न होता भक्त न होता बाबासाहेबांचे वैचारिक अनुयायी होऊया.
क्रांतिकारी जयभीम,
जय संविधान,
जय प्रबुद्ध भारत,
आपला
शिक्षित पँथर,
एक रिपब्लिक,
डॉ विलास जोंधळे.
महामानव,
राष्ट्रनिर्माते,
सिम्बॉल ऑफ नॉलेज,
भारताच्या संविधानाचे शिल्पकार,
आधुनिक बुद्ध, आमच्या जीवनातील सूर्य,
विश्वरत्न,
युगप्रवर्तक,
प्रज्ञासूर्य,
बोधिसत्व,
भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंतीच्या
कोटी कोटी शुभेच्छा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत