दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

स्वातंत्र्यवीर कॉ. भगतसिंग, कॉ. सुखदेव, कॉ. राजगुरु, कॉ. अशफाक उल्लाह खान यांना क्रांतिकारी लाल सलाम

कॉम्रेड भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, अशफाक उल्लाह खान या देशासाठी फासावर जाणाऱ्या शहीदांचा लढा हा केवळ इंग्रजांना भारतातून घालवण्यापुरता मर्यादित नव्हता. साम्राज्यवाद ही भांडवलशाहीचीच वरची अवस्था आहे. माणसाकडून माणसाचे, देशाकडून देशाचे शोषण करणाऱ्या या भांडवली, साम्राज्यवादी व्यवस्थेविरुद्ध हे तरुण वैचारिक आयुधे घेवून उभे होते. त्यांना इंग्रज या देशातून गेल्यानंतर इथे लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व्यवस्था हवी होती. उत्पादनाची साधने, मनुष्यबळ, नैसर्गिक संसाधने मुठभरांच्या मालकीची नव्हे तर तमाम समाजाच्या मालकीची असलेली व्यवस्था हवी होती. स्वातंत्र्य, समता, बंधूता, सत्ता-संपत्तीचे न्याय्य वाटप, सत्ता व प्रशासनात न्याय्य व समान संधी असलेली व्यवस्था त्यांना अपेक्षित होती.

हीच मूल्ये भारतीय संविधानात अंतर्भूत आहेत. पण हे संविधान लोकांना कळू दिले गेले नाही. संविधानाची मूल्ये लोकांमध्ये रुजवली गेली नाहीत. आज तर संविधान संपवण्यासाठी ब्राह्मो-भांडवली शक्ती पूर्ण ताकतीनिशी कट, कारस्थानं करीत आहेत.
माफीवीराचे स्वातंत्र्यवीर म्हणून उदात्तीकरण करीत त्याच्या ‘गौरव यात्रा’ काढल्या जात असतानाच्या काळात आम्ही उमरगा-लोहारा भागात “भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, अशफाक उल्लाह खान विचार यात्रा” काढली. त्यावेळी इथल्या कॉंग्रेसचे तत्कालीन मुखंड या विचार यात्रेत सामील झाले नाहीत, उघड समर्थन दर्शवले नाही की या विचार यात्रेचे कौतुक केले नाही.

आता ते मुखंड भाजपात सामील झाल्याने त्यांचे खरे चेहरे उघड झाले आहेत. मोजके नेते वगळता कॉंग्रेसमधील बहुतांश मातब्बरांनी आजवर संघ-भाजप-उजव्यांच्या विरोधात परखड आणि प्रखर भूमिका घेतली नाही, कुठला सांस्कृतिक पर्याय दिला नाही की आक्रमकपणे विरोधकांची भूमिका निभावली नाही. ही भूमिका निभावाण्याचे खरे काम करीत आहेत ते पुरोगामी विचारांवर आणि संविधानावर निष्ठा असणाऱ्या शेतकरी, श्रमिक, सर्वसामान्य तसेच दलित आणि महिला वर्गातील व्यक्ती आणि संघटना.
म्हणून या देशातल्या प्रमुख विरोधी पक्षाने आता तरी आपला ताबा महालात बसलेल्या बड्या धेंडांकडून सोडवून घेतला पाहिजे. कॉंग्रेससह डावे, आंबेडकरवादी, पुरोगामी, स्त्रीवादी चळवळी यांनी एकत्र येत आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे, बांधावरुन आलेल्या रांगड्या, लढवय्या लोकांकडे ब्राह्मो-भांडवली व्यवस्थेविरुद्ध लढण्याचे नेतृत्व दिले पाहिजे. तीच खरी तमाम मानवतावादी महामानवांना आदरांजली ठरेल.

जय बसवण्णा, जय शिवराय, जय भीम, लाल सलाम.

© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!