टिळकाने गाडगेबाबांना स्टेजवर आणले,टिळकाच्या ब्राह्मणपंथाला शब्दांनी झाडले..
एकदा एका महाराला त्याच्या मुलाचे पत्र
आले. अनाडी महार धावत गावातील
ब्राम्हणाकडे (कुलकर्णी) जाऊन ते पत्र
वाचायला दिले. ब्राम्हणाने
त्याच्या गैरफायदा घेतला. “माझे लाकडं
फोडून दे मगच वाचून दाखवतो.”
महाराने बरीच लाकडं
फोडली तरी ब्राम्हणाने पत्र वाचून
दाखवले नाही. महार विनंती करु
लागला “काय लिहीले पत्रात?
माझ्या पोरगा सुखी आहे ना हो?”
बारीक लाकडे फुटली होती पण
गाठी असलेली लाकडे फुटत नव्हती. महार
घामाघुम झाला. त्याने
प्यायला पाणी मागितले पण ब्राम्हणाने
पाणी पाजले नाही. मनाला वाटेल
त्या शिव्या दिल्या. शेवटी महार
म्हणाला “वाचायचं नसेल तर नका वाचू.
मी गाठी फोडणार नाही.” तेव्हा ब्राम्हण
म्हणाला” गाठी फोड तेव्हाच पत्र परत
देतो.” ब्राम्हणाचे वाक्य ऐकूण महार
परतणारच तेव्हढ्यात गाडगे बाबा पाऊल
सरकवत पढे सरकले
त्यांनी तो तमाशा पाहिला.
हातची काटी बाजुला ठेवुन कुर्हाड हातात
घेतली. मोट्या कष्टाने गाठी फोडल्या.
आणी मग ब्राम्हणावर नजर रोखुन
त्याला दम
भरला”दादाजी देता का नाही या महाराचे
पत्र.”
असे होते गाडगे बाबा.
पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते.
तेवढ्यात बाबा समोरुन येत होते.
सगळ्यांच्या माना वळल्या.
श्रोत्यांच्या मनातले ओळखुन टिळकाने
बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द
बोलायला सांगितले. टिळकाचे अथनी चे
भाषण बाबांना ठाव होते. स्टेजवर येताच
बाबांनी टिळकाच्या ब्राह्मण
पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली.
बाबा म्हणाले “टिळक महाराज मी चुकलो.
आम्ही ह्यातभर तुमची कापडं धुतली,
ईस्त्री केली. तवा आम्ही कसा मार्गदर्शन
करु? महाराज काय बी करा पण
आम्हाला बी ब्राह्मण करा.”
गांधीने कित्येक सामाजिक आंदोलन बंद
पाडुन स्वतच्या मनमर्जीचे निरर्थक आंदोलन
चालविली. बाबांचे आंदोलन समाप्त
करण्यासाठी गांधीने बाबांना भेट
देण्याचा प्रयत्न केला. गांधीने निरोप
पाठविला तेव्हा बाबा म्हणाले “मुझे
क्या काम है उनसे. समाज का बहुत काम
करना है. मेरे पास वक्त नही है.”
तेव्हा गांधीने नवीन उपाय आखला. मुम्बई
प्रांताचे प्रोविंशियल मुख्यमंत्री बाळ
गंगाधर खेर
या आपल्या चेल्याला बाबांना भेटण्यास
सांगितले. हा तोच खेर होता ज्याने
कधीतरी बाबांवर ढोंगी असल्याचा आरोप
केला होता. मात्र नंतर
त्याला बाबांची माफी मागावी लागली.
बाबांच्या कार्याचे महत्त्व त्याला चांगलेच
कळले.
१४ जुलै १९४१ ला बाबांची प्रकृती ठिक
नव्हती.
महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने
मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे
बाबांची खबर दिली. बाबासाहेब
तेव्हा भारताचे कायदामंत्री होते.
आणी त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने
दिल्ली ला रवाना व्हायचे
होते.बाबांच्या निरोप मिळताच
त्यानी सर्व कामं बाजूला ठेवली. २
घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी सह
रुग्नालयात भेट द्यायला गेले. कोणाकडुन
काही न
घेणाय्रा बाबांनी बाबासाहेबांकडुन २
घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले “डॉ.
तुम्ही कशाला आले? मी एक फकिर. तुमचा एक
मीनीट महत्त्वाचा आहे.
तुमचा किती मोठा अधिकार आहे.”
तेव्ह बाबासाहेब म्हणाले
“बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा.
उद्या खुर्ची गेल्यावर
मला कोणी विचारणार नाही. तुमचे
अधिकार मोठा आहे.”
या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात
अश्रु होते. कारण असा प्रसंग
पुन्हा जिवनात येणार नाही हे
दोघेही जाणवत होते.
आज २३ फेब्रुवारी, गाडगे बाबांची जयंती.
बाबांना क्रांतिकारी प्रणाम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत