अहो संकुचित बिळातून बाहेर या…

डॉ अनंत राऊत
कुरापतखोर शेजाऱ्यांच्याविरोधात बाळाचा वापर वगैरे ठीक आहे.यात चीनही आहे ना?
अहो सन्माननीय मोहनजी भागवत,
संविधान विरोधी मानसिकता आता तरी बदला. संकुचितता सोडा. धर्माच्या नावाने लोकांची विभागणी करणे थांबवा. जो कोणी धर्माच्या नावाने विशिष्ट धर्मियांवर अन्याय करतो तो मानवतेचा शत्रू असतो अशी भूमिका घ्या.
काय हा खुळेपणा लावलाय?
“गौरवशाली भारतासाठी फक्त हिंदूंच्या ऐक्यची गरज” आहे काय? तुम्ही या संकुचित वैचारिक बिळातून कधी बाहेर येणार आहात? हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, पारशी या सर्व भारतीयांच्या ऐक्याची गरज नाही काय?
कसा बदलायचा तुमचा हा संकुचित मेंदू?
अहो भागवतजी भारत हे सेक्युलर राष्ट्र आहे. विशिष्ट धर्माधारित राष्ट्र नाही.
‘इंडिया दॅट इज भारत’हा संविधानाचा पहिला अनुच्छेद आहे.
संविधानाच्या उद्देशिकेमध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा नवभारताच्या निर्मात्यांनी संकल्प केलेला आहे. या संकल्पाच्या विरोधात जणं आता तरी थांबवा.
भारतीय संविधानाचं तत्त्वज्ञान आणि त्यातली सर्वसमावेशक जीवनमूल्ये अजूनही तुमच्या मेंदूत का रुजत नाहीत?
तुमची परंपराच संविधान विरोधी, समताविरोधी त्यामुळे तुम्ही असेच बोलणार.
(मोहन भागवतांचे उद्गार आजच्या दै. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत