महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

घटकंचुकी

शनवारवाड्यात घटकंचुकीचे खेळ चालायचे. घटकंचुकी म्हणजे, अनेक गुलाम स्रियांच्या चोळ्या एका घागरीत जमा केल्या जायच्या. बाजीरावाच्या किंवा त्याच्या सरदारांच्या हाताला ज्या स्रीची चोळी हाती लागेल. त्या स्रीसोबत तो सरदार जायचा. बाजीरावाला नागव्याने आंघोळी घालायला अनेक स्रिया असायच्या. नागव्याने तो स्रियांसोबत भोजनही करायचा. वाड्यातील रंगेल वर्णने जर आपण वाचली, तर एखाद्या पोर्न मुव्हीपेक्षाही सुरस अशा गोष्टी सिनेमांतून दाखवतात त्या तो प्रत्यक्ष करायचा. इतका तो रंगेल होता. तितकाच तो क्रूरही होता.

आताची महाराष्ट्राची स्थिती फार वेगळी नाही. कुठल्याही पक्षातील नेत्याला हात लावायला खोटी की तो आपलाच. फक्त आता तिथे ‘घटकंचुकी’ ऐवजी आपण ‘घटलंगोटी’ असा शब्द वापरायला हवा आहे. वैश्यावृत्तीपेक्षाही इतर पक्षांतील नेत्यांची स्थिती झाली आहे. उठ म्हटलं की उठायचं. बस म्हटलं की बसायचं. अनाजी म्हणेल तसं सुरु आहे.

बरं हे लोक संपत्तीमुळे किंवा भ्रष्ट मार्गाने पैसा कमावल्यामुळे तिकडे जात आहेत, असं म्हणावं तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगना, तमिळनाडू या राज्यांतील कितीतरी नेते असे संपत्तीवान आहेत. परंतु ते अजूनतरी असे शरणागत झाले आहेत असे फारसे ऐकिवात नाही. याचे कारण, तिकडील ‘सांस्कृतिक राजकारणा’ त आहे. ते आपली भाषा, आपला प्रांत आणि विचार यांच्यावर प्राणांपलीकडे प्रेम करतात. आपले बहुजन लेखक, कवी, विचारवंत, कादंबरीकार, कथाकार, नाटककार ब्राह्मणी अधिमान्यतेसाठी भुकेलेले असतात. आपल्याकडील बुद्धिजीवी जातवर्गाची ही स्थिती असेल, तर राजकीय जातवर्गाकडून आपण काय अपेक्षा करणार आहोत?

आपण महात्मा जोतिराव फुले यांच्या सर्व प्रकारच्या सांस्कृतिक राजकारणाला विसरलो. ही हानी केवळ आणि केवळ या एकाच गोष्टीमुळे आहे.

बहुतांश मराठा, माळी, वंजारी, तेली, धनगर, नवबौद्ध आणि मुस्लिम असे सगळे आपापला सरंजाम वाचविण्यासाठीच जगणारे सरंजामदार नेते असेच गळाला लागलेले नाहीत. कुठलाही स्वाभिमान तर नाहीच पण आपण ज्या समाजातून येतो त्या पूर्वसूरींच्या पराक्रमाचे आपण काहीतरी देणे लागतो याचे यत्किंचितही भान या लोकांकडे नाही.

हे सगळे मृत लोक आहेत. यांना येणारं मरणही तसच आहे. तसच असेल. गुलामांचं मरण. गुलाम मेले काय आणि जिवंत राहिले काय?

फार दिवस नाही १९६४ ची गोष्ट आहे. क्युबाचे क्रांतिकारी नेते अर्नेस्टो चे गव्हेरा यांनी युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये फक्त सहा शब्दांचं भाषण दिलं. काय होतं ते भाषण?
“Homeland or Death! We shall overcome!”

इतका जाज्ज्वल्य अभिमान असणारी माणसं कुठे आणि आजचे शिवछत्रपती, शंभूराजांचं, फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेणारे हे गुलाम राजकीय नेते कुठे?

या मृत लोकांचे राष्ट्र म्हणजेच जणू महाराष्ट्र. असा हा काळ.

जय महाराष्ट्र!

टीप : १) घटकंचुकीचा संदर्भ खाली देतो आहे.

“पुण्यात बाजीराव रघुनाथ यांची घटकंचुकी सर्वप्रसिद्ध आहे. निवडक स्रीपुरूष रंगमहालात जमून स्रियांच्या चोळ्या एका घागरीत घालीत व ज्या पुरूषाला ज्या बाईची चोळी सापडे तिशी तो सर्वांदेखत रममाण होई. या पाशव खेळाला घटकंचुकी म्हणत. ही घटकंचुकी कर्नाटकात पाचपन्नास वर्षापूर्वी प्रचारात होती. घटकंचुकीत वडील, धाकुटे किंवा नाते हा भेद पाळीत नसत ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. असो.”

  • भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास. – ले.इतिहk.वि.का.राजवाडे. पृष्ठ क्रमांक – ३८.
    पहिली आवृत्ती – १९७६. प्रकाशक – लोकवाङमयगृह, मुंबई.

२) सरंजाम, सरंजामशाही या संकल्पनेचे युरोपीय, मध्ययुगीन भारत आणि निजामकालीन अर्थ आणि त्याची रचना वेगवेगळी आहे.
युरोपात “या व्यवस्था-प्रणालीत उच्च्भू वर्गाच्या (लॉर्ड्स) सभासदांत कंत्राटदारी (करार) पद्धतीचे आप्तसंबंध असून वरिष्ठ सत्ताधीश या पोटजहागिरदारांना मोकासा किंवा सरंजाम देत असत आणि त्या मोबदल्यात त्यांच्याकडून लष्करी व राजकीय सेवेचे अभिवचन (तारण) घेत.”

तर, “सरंजामशाहीतील पोटजहागिरदार-मोकासादार यांना काही विशिष्ट सन्मान व अधिकार राजाने समारंभपूर्वक दिलेले असत. प्रत्येक पोट-जहागिरदाराला स्वामिनिष्ठेची शपथ घ्यावी लागे आणि त्यास राजाला जहागिरीच्या उत्पन्नातील काही भाग दयावा लागे, शिवाय आवश्यकतेनुसार लष्करी मदत करावी लागे.”

“मध्ययुगातील सरंजामशाहीची काही खास वैशिष्टये होती. राजा आपल्या राज्यातील मुलुख वा गावे काही श्रेष्ठ सरदार वा अमीर-उमरावांना देत असे. हे सरदार आपल्या अखत्यारीतील जमीन पोटजहागिरदारांना विशिष्ट अटींवर खास समारंभाव्दारे कसण्यासाठी देत. त्या मोबदल्यात ते लष्करी सेवा, धान्य व अन्य स्वरूपात मोबदला देत. शिवाय सरदारांनी त्यांना सेवेसाठी पाचारण केल्यास हजर राहू, असे आश्वासन त्यांना दयावे लागे.”
-Shared

Dr Sangram Patil यांच्या वॉल वरून.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!