क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रम…

सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी केली जाते. थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १९३वी जयंती आहे. या निमित्याने आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव इथे आज सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीच्या नुतनीकरण कामांचे लोकार्पण मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत