
सरकारी योजनांचा लाभ देशभरात शंभर टक्के पोचवण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर २०२३ ला या यात्रेचा प्रारंभ केला. विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत १५ कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत आरोग्य शिबिरांमध्ये ४ कोटी लोकांची तपासणी झाली आहे.या यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भातली आकडेवारी दिली आहे. माय भारतमध्ये ३८ लाखांहून अधिक लोकांनी नोेंदणी केली, तर २ कोटी लोकांना आयुष्मान कार्ड वितरित झालं आहे. हर घर जलच्या योजना ७९ हजार ग्रामपंचायतींमध्ये पोचली आहे, तर १७ हजार ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या आहेत. १ लाख ३८ हजार ग्रामपंचायतींकडची जमिनीची माहिती डिजिटाईज झाली आहे. असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. राज्यातही अनेकांना या यात्रेचा लाभ झाला आहे. या यात्रेत नागरिक अतिशय उत्साहानं सहभागी होत असून विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत