फिल्म सत्यशोधक चे निमित्ताने…

ऍड अविनाश टी काले अकलूज
मो न 9960178213
छ संभाजी ब्रिगेड चे संस्थापक व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय प्रवीण जी दादा गायकवाड साहेब यांनी प्रवीण तायडे यांनी निर्मित केलेला “सत्यशोधक “हा क्रांतीबा जोती राव जी फुले यांच्या जीवनावर बेतलेला चित्रपट , त्याचा ट्रेलर , आणि या चित्रपटावर व तो सर्व बहुजनांनी चित्रपट गृहात जाऊन पहावा असे केलेले आवाहन आणि त्याचे केलेले मार्मिक विवेचन माझ्या सद्भग्याने आम्ही एक मेकांना व्हॉट्सॲप चे माध्यमातून जोडलो गेलेलो असल्याने माझ्या कडे ही आल्या ,
यावर मी ही कांहीं तरी लिहावे अशी सूचना ही त्यांनी केली , ती सूचना आहे असे न समजता बहुजन वादी व विवेक वादी चळवळीचे नेते या नात्याने त्यांनी दिलेला तो आदेश आहे असे मी समजतो ,
याचे कारण फक्त बोलघेवडे पणा करणारे अनेक नेते असतात पण समग्र जीवन समाजासाठी समर्पित करणारा असा प्रवीण दादा सारखा एखादाच नेता असतो ,
वास्तविक पाहता दादा ची मांडणी इतकी विस्तृत आहे की फक्त ती सर्व समाज घटका पर्यंत पोहचली तर त्या साठी वेगळे प्रयास करण्याची कोणतीच आवश्यकता उरणार ही नाही
आमच्या दोघांच्या विचाराचे सार वेगळे असण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही , याचे कारण आमचा पाया तोच आहे
महात्मा जोतिबा फुले , हे नाव देशाला माहीत आहे , आणि या देशातील सामाजिक क्रांतीचे चक्र निर्भिड पणे फिरवण्यात कुणाचे योगदान मौल्यवान असेल तर ते फक्त महात्मा जोतिबा फुले यांचे आहे ,
पुण्यातील पेशवाईचा नुकताच अंत झालेला , आणि देश भरात ब्रिटिश राजवटीच्या खऱ्या कालखंडाला सुरुवात झालेली असताना या सामाजिक सुधारणेला आणि कठोर अश्या धर्म चिकित्सा याला प्रथम हात घातला तो फुले यांनीच
अर्थात धर्म , रूढी , परंपरा याने सर्वोच्य स्थानी असलेला आणि सामाजिक मान्यता याने शिरोधार्य असलेला पूजनीय मानलेला सर्व श्रेष्ठ वर्ण फक्त नी फक्त ब्राम्हण होता
इतर कोणत्याही धर्मात एखादा पुरोहित म्हणून निर्माण होत असे , परंतु या साठी ती व्यक्ती त्या धर्मातील असावी इतकाच नियम असे ,
तत्कालीन वर्ण व्यवस्थेने ब्राम्हण वगळता इतर सर्व वर्णीयांना शूद्र अतिशूद्र व्यवस्थेत ढकलले आणि त्या साठी “ब्रम्हा ” नावाचे मिथक उभे केले ,
या वर्ण व्यवस्थेला विरोध करताना महात्मा फुले यांनी त्या ब्रम्हा वरच प्रश्न चिन्ह निर्माण केले , इतिहासाचे अन्वेषण करताना त्यांच्या इतके कठोर भाष्य आजच्या काळात ही केवळ अश्यक्यप्राय आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे विदित केले आहे की , व्यक्ती शिक्षित होणे , पदवीधर होणे तुलनेने सोपे आहे परंतु ती तर्क निष्ठ होणे , विचारशील बनणे केवळ कांहीं लोकांनाच श्यक्य आहे .
महात्मा फुले हे केवळ बोलघेवडे सुधारक नव्हते तर ते व्यवस्थेचे , मग ती धार्मिक , सामाजिक , आर्थिक , राजकीय अश्या समग्र व्यवस्थेचे चिकित्सक होते ,
या चिकित्सा खाजगीत करणे आणि त्या सार्वजनिक रित्या करणे यातील धोके आज ही इतके तीव्र आहेत तर 200वर्षा पूर्वी ची स्थिती काय असेल? याचा ही विचार केला तर अंगावर काटे उभे राहतात , ते ही पुण्या सारख्या शहरात जिथे कर्मठ ब्राम्हणी सत्तेची राजधानी अस्तित्वात होती आणि हा समाज तिथे बहु संख्याक स्थितीत अस्तित्वात होता
कार्ल मार्क्स यांनी जागतिक पातळी वरील आर्थिक सिद्धांत मांडला तो भांडवल दार वर्गाकडून कामगार वर्गाचे होणारे शोषण आणि त्यातून निर्माण होणारे वरकड मूल्य यातून भांडवल दार वर्ग अधिकाधिक श्रीमंत होत जातो , तर कामगार वर्ग अधिकाधिक गरीब होत जातो , म्हणून त्यांनी शोषक आणि शोषित अशी व्याख्या केली , परंतु हा सिद्धांत भारतात जसा तसा लागू होत नव्हता ,
भारताचे खरे विश्लेषण महात्मा फुले यांनी केले आणि शूद्र अतिशुद्रच्या गरीब असण्याला वर्ण व्यवस्था कारणीभूत असल्याचे निदर्शनास आणून दिले ,
हे शूद्र का खचले? तर त्यांना विद्याहिन बनवल्या ने हे त्याचे साधे सरळ कारण त्यांनी सांगितले , विद्या नसल्याने मती गेली , मती नसल्याने धन ही गेले , आणि वित्त विना शूद्र खचले ,
मराठा , राजपूत अश्या क्षत्रिय समाजाने तलवारी चे जोरावर शौर्य दर्शवून राज्य निर्माण केली परंतु हीच राज्यव्यवस्था धर्म सत्तेच्या अंकित राहिल्याने त्याचा उपभोग मात्र पुरोहित वर्गाने घेतला ,
हजारो जाती चे कोंडाळे निर्माण करून त्यात इतकी गुंतागुंत निर्माण केली ,ज्याचा गुंता आज ही सुटता सुटत नाही , कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ या भावना इतक्या पराकोटीच्या आहेत की आज ही प्रत्येक व्यक्ती जात समूहाचा घटक म्हणून जीवन जगत आहे
प्रस्थापित शोषण कर्ता फक्त आपल्या जात समूहाचा आहे म्हणून नायक बनवला जातो , तोच समाजाचा आयकॉन बनवला जातो , म्हणून इथे शोषकांच्या विरोधात शोषितांची लढाई ही उभी राहत नाही ,
हे वास्तव बदलण्या साठी समाज परिवर्तन शील बनला पाहिजे , या साठी इतिहास समजून घेतला पाहिजे , पुस्तके वाचली पाहिजेत ,
पण आजच्या व्हॉट्सॲप चे काळात ही पुस्तके वाचणारा वर्ग आकुंचित होत चालला आहे हे वास्तव आहे
“इतिहासाचे ज्ञान नसेल तर तो गवंडी बनू शकतो , रचनाकार किंवा स्थापत्य विशारद बनू शकत नाही ” अश्या अर्थाची इंगर्जी भाषेतील म्हण अस्तित्वात आहे , तो इतिहास जसा पुस्तकातून मांडला जातो तसाच तो नाट्य आणि चित्रपट याचे सारख्या माध्यमातून ही मांडला जातो ,
तो कशाच्या ही माध्यमातून मांडला गेला तरी असा इतिहास हा सत्य असू शकतो , किंवा अर्धसत्य असू शकतो , किंवा पूर्णतया काल्पनिक ही असू शकतो , तो कसा ? आणि कुणी मांडला आहे यावर त्याची सत्यता अवलंबून असते , आणि त्या मागील हेतू ही महत्वाचा असतो
आदरणीय प्रवीण दादा गायकवाड साहेब यांनी तो सिनेमा पहावा म्हणून केलेले आवाहन पाहता मला खात्री आहे की हा चित्रपट नक्कीच त्यांच्या सत्य पारखी दृष्टीस पसंत पडलेला असेल ,
सोनार सोन्याची पारख सोन्याला कसोटीच्या दगडावर घासून पाहतो , हा कसोटीचा टप्पा प्रवीण दादा चे आवाहनाने पार केलेला आहे असे माझे स्पष्ट मत आहे ,
या सर्व लढाई तील फुले दांपत्य यांची जीवन कथा , त्यांचा संघर्ष , आणि सामाजिक क्रांती कारि बदला वरील अविचल निष्ठा , त्यांच्या लढाईत साथ दिलेले लहुजी वस्ताद सारखे बहुजन नायक , या सर्व इतिहासाची उजळणी लेखात करणे अनावश्यक ठरते याचे कारण तोच चित्रपटाचा आशय आहे ,
पण ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या जागतिक विद्वान नेतृत्वाने , आणि आयुष्यभर समाजाच्या उद्धारा साठी संघर्ष करणाऱ्या घटना कारानी ज्यांना आपले गुरू मानले , त्यांच्या प्रति मी अधिक काय बोलावे ?
ज्या माई सावित्री यांना महात्मा जोतिबा फुले यांनी घडवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी घालून दिला त्या साऊ म्हणजे
“साऊ ,,,,,पेटती मशाल साऊ ,,
आग ती जलाल साऊ,
शोषितांची ढाल साऊ,
मुक्ती च पाऊल ,,,
हा सारा संघर्ष आपण त्या काळात जाऊन पाहू शकतो ,
बहुजन नायकांच्या जीवन चरित्रावर आधारित नाट्य , चित्रपट , अश्या कलाकृती ना समाजाचा आर्थिक हातभार लागला तरच हे प्रयास टिकून राहू शकतील , आजच्या प्रति क्रांती कारि सत्ता काळात हे धाडस दर्शविणारे निर्माते , कलाकार हे सर्व क्रांती कारक आहेत , त्यांना सपोर्ट म्हणून आपण फक्त एवढेच करायचे आहे , आपण स्वतः , आपल्या घरातील सर्व सदस्य , आपले मित्र परिवार यांनी चित्रपट गृहात जाऊन हा सिनेमा पाहिला पाहिजे , तो
5 जानेवारी 2024ला सर्वत्र प्रसारित झालेला आहे , आपल्या नजीकच्या चित्रपट गृहात जाऊन तो पहावा अशी मी विनंती करतो
जय जिजाऊ , जय जोती, जय भीम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत