ब्राम्हण समाज केवळ बहुजनांना देवाधर्माच्या नावाखाली लुबाडण्याचे काम करतो आहे–एम. के. स्टॅलिन

ऐतखाऊ ब्राम्हण पुजारी जिथून तिथून मंदिरातून हाकलून दिले पाहिजेत आणि ब्राम्हणेतर पुजारी घेतले पाहिजेत … या देशातील ब्राम्हण समाज केवळ बहुजनांना देवाधर्माच्या नावाखाली लुबाडण्याचे काम करतो आहे. ब्राम्हण पुजारी नाही म्हणून देव कांही रुसत नाही … की फुगत नाही … कारण देवाला कधी भक्तावर रुसता वा फुगता येत नाही. असे आमच्या संतानी सांगितलेले आहे म्हणून मंदिरातून ब्राम्हण हटाव झालेच पाहिजे
तामिळनाडूच्या मंदिरांत आता ब्राम्हणेतर पुजारी
१०० दिवसांत २०० पुजारी नियुक्त करण्याची एम. के. स्टॅलिन सरकारची तयारी, पोटा-पाण्यावर गदा येणार असल्याने ब्राम्हणांमध्ये चलबिचल
तामिळनाडू: अघोषित आरक्षण असल्याप्रमाणे देशातील सर्व मंदिरांवर कब्जा करून ब्राम्हण बडव्यांनी मंदिरांना घेरले आहे. मंदिरात पूजा आणि त्या पूजेच्या माध्यमातून बहुजनांना लुटणे हा एककलमी कार्यक्रम असणार्या ब्राम्हणांना आव्हान देण्याचे काम तामिळनाडूच्या एम.के.स्टॅलिन सरकारने घेतला आहे. तामिळनाडूच्या मंदिरांत आता ब्राम्हणेतर १०० दिवसात २०० पुजारी नियुक्तीची घोषणा करण्यात आल्याने ब्राम्हणांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण ब्राम्हणेतर पुजारी नियुक्त झाल्यास ब्राम्हणांच्या पोटा-पाण्यावर गदा येणार असल्याने त्यांच्यात चलबिचल सुरू झाली आहे
तामिळनाडूच्या एम. के. स्टॅलिन सरकारने १०० दिवसांत राज्यात २०० ब्राम्हणेतर पुजार्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. लवकरच १०० दिवसांचा ‘शैव अर्चक’ कोर्स सुरू केला जाईल, तो पूर्ण केल्यानंतर कोणीही पुजारी होऊ शकतो. या नियुक्त्या तामिळनाडू हिंदू रिलीजियस अँड चॅरिटेबल इंडॉमेंट डिपार्टमेंटच्या (एचआर अँड सीई) अधीनस्थ ३६ हजार मंदिरांत होतील. लवकरच ७० ते १०० ब्राम्हणेतर पुजार्यांची पहिली यादी जारी होईल
दुसरीकडे, यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजपने म्हटले आहे की, द्रमुकचा पायाच हिंदू विरोधाच्या मूळ विचारसरणीवर आहे. सरकार एखादी मशीद किंवा चर्चवरही नियंत्रण करणार आहे का? द्रमुकच्या महिला आघाडीच्या सचिव आणि खासदार कनिमोझी यांनी स्वत:ला हिंदूंचा रक्षक म्हणणारा भाजप हिंदूंच्या एका वर्गासोबतच का उभा आहे, असा प्रश्न विचारला
तामिळनाडूचे धर्मार्थ प्रकरणांचे मंत्री पी. के. शेखर बाबू म्हणाले की, मंत्रालयाच्या अधीनस्थ मंदिरात पूजा तामिळ भाषेमध्येच व्हावी हे सुनिश्चित करू. राज्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायणन तिरुपती म्हणाले की, तामिळनाडूच्या मंदिरांत हजारो वर्षे जुनी परंपरा आहे. द्रमुकने नेहमीच हिंदूविरोधी भूमिका घेतली आहे. हजारो मंदिरांत पूर्वीपासूनच ब्राम्हणेतर पुजारी आहेत
प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष के. टी. राघवन यांच्या मते, मंत्र तामिळमध्ये म्हणावेत अशी सरकारची इच्छा आहे, पण हे कसे शक्य आहे? द्रमुक राजकीय लाभासाठी हिंदूंमध्ये मतभेद निर्माण करत आहे. मद्रास विद्यापीठाचे प्रा. मणिवन्नन म्हणाले की, ब्राम्हणेतर पुजार्यांची लढाई जुनी आहे. १९७० मध्ये पेरियार यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा द्रमुक सरकारने नियुक्तीचे आदेश दिले
१९७२ मध्ये सुप्रीम कोर्टाने आदेशाला स्थगिती दिली. १९८२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांनी आयोग स्थापन केला होता. आयोगाने सर्व जातीच्या व्यक्तींना प्रशिक्षण दिल्यानंतर पुजारी म्हणून नियुक्ती करावी, असे आदेश दिले होते. दरम्यान स्टॅलिन सरकारच्या या पुरोगामी निर्णयामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. या निर्णयाने मात्र ब्राम्हणांचा तीळपापड झाला आहे
7219017700
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत