बुध्दिझम : विज्ञान की निसर्ग नियम ; प्रकाश तक्षशील
(प्रकाश तक्षशील)
(928414603.)
बुध्दिझम बाबत बौध्दसमाजामध्ये दोन मत प्रवाह दिसुन येत आहे. एक प्रवाह बुध्दिझमला विज्ञानाशी जोडतात तर दुसरा प्रवाह हा निसर्ग नियमाशी जोडतात.
हे जानुन घेन्यासाठी सर्वप्रथम आपणास बुध्दाने सांगीतलेला कार्यकारण भाव (प्रत्युत्य समुत्पाद) हा सिध्दांत समजून घेने आवश्यक आहे.
प्रत्यूत्य समुत्पाद (कार्य कारण भाव)
या सिध्दांताला बौद्ध धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे. या सिद्धांताचा संबंध विज्ञानाऐवजी नैसर्गिक नियमाशी जोडण्या पूर्वी हा सिध्दांत बुध्दाला का प्रतीपादित करावा लागला, हे समजून घेने जरुरी आहे.
दुधाचे दही होने, दह्याचे लोनी होने व लोन्याचे तूप होने, ह्या प्रक्रियेचा संबंध प्रत्युत़्य समुत्पादाशी जोडने म्हणजे बुध्दाच्या त्या महान अश्या सिध्दांताची अवहेलना केल्या सारखे होईल.
निसर्गामध्ये घडनाऱ्या घटना, जसे भुकंप येने, मुसळधार पावसामुळे नद्यांना पुर येवुन जनसामान्याचे अतोनात नुकसान होने इ.प्रकारच्या घटनेला तत्कालिन जन समुदाय हे दैविय कोप समजून त्याचा संबंध ते पारलौकिक शक्ती*शी जोडत होते. ह्या गैरसमजातून (अंध:श्रध्दा) बाहेर येन्यासाठी *प्रत्युत्य समुत्पाद (कार्यकारण भाव) हा सिंध्दांत तथागत बुध्दांनी प्रतिपादीत केला व ‘पारलौकिक (ईश्वरी) शक्तिचे अस्तित्व नाकारले’.
निसर्गामध्ये घडनाऱ्या घटनेचा, ज्याला कुणी ‘निसर्ग नियम’ पन म्हणत असेल, याचा संबंध विज्ञानाशी नाही, असे कोण बरे म्हणु शकेल?निसर्ग नियम म्हणुन प्रचलित असलेल़्या कित्येक गोष्टी नंतर विज्ञानाद्वारा बाद ठरविल्या गेल्या. वर फेकनारी वस्तु परत खालीच येते अश़्या प्रकारच्या घटनेला पुर्वी निसर्ग नियम म्हणुन पाहायचे, तेच आता गुरुत्वाकर्षण शक्तीच्या रुपात आपन पाहत आहे. ‘हा निसर्गाचा चमत्कार आहे’ अश्या प्रकारचे वाक्य आजपन आपनास वेळोवेळी ऐकावयास मिळतात. परंतू आपन सर्व जानतोच की, ही निसर्गाची शक्ती नसुन विज्ञानाची शक्ती होय. बिना कारणाशिवाय कोणतीही घटना घडत नसते, व ते कारण शोधन्यासाठी विज्ञानाचीच गरज भासते. ‘हा निसर्ग नियम आहे’ म्हणुन सदर घटनेचा सोक्षमोक्ष लावता येत नाही.
१२ घंटे राञ व १२ घंटे दिवस, म्हणजे सुर्य हा १२ घंटे आपणास दिसत नाही, हे पन निसर्ग नियमामध्येच येते. तर मग हाच निसर्गाचा नियम आर्टिक्ट प्रदेशामध्ये (उत्तर धृव) मध्ये दिसुन येत नाही. तेथे सहा महिने राञ व सहा महिने दिवस असतात, असा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘WHO WERE THE SHUDRAS’ ह्या ग्रंथामध्ये लोकमान्य टिळकाच्या ‘ARTICT HOME IN VEDAS’ ह्या ग्रंथाचा उल्लेख करतात. निसर्गाचा हा नियम दोन ठिकाणी अलग अलग कसा ? ह्या प्रश्नाचे उत्तर पण विज्ञानानेच सांगितले आहे.
तथागत बुध्द हे वैज्ञानिक नव्हते, असे ही एका प्रवाहाचे मत आहे. ठिक आहे, माऩ्य करतो. लॅब मध्ये जावुन परिक्षण करुन एक नविन कंपाऊंड तयार करनाऱ्याला वैज्ञानिक म्हटल्या जाते अथवा मानवी विकासासाठी तथा विनाशासाठी भौतिक वस्तुचा शोध घेनाऱ्याला वैज्ञानिक म्हटल्या जात असेल, तर मग संपुर्ण मानव जातिच्या हिताकरिता व त्यांच्या दु:ख मुक्तीसाठी एका मार्गाचा शोध लावल्या जातो. व तो दु:खमुक्तीचा मार्ग लगभग संपुर्ण जगाने मान्य केला असतो. अश्या त्या शोधकर्त्या तथागत बुध्दाला कुणी वैज्ञानिकचा दर्जा देत असेल, तर यामध्ये काय चुकीचे आहे?
कुणी एक फॉर्मुला देतात व त्या फॉर्मुल्यावर कार्य करुन वैज्ञानिक म्हणुन स्वत:ची ओळख करुन घेतात. तर मग २५०० वर्षापुर्वी तथागत बुध्दांनी एक प्रमेय मांडले व तेच प्रमेय शोधकर्त्यासाठी प्रेरक बनले व त्या प्रमयावरुनच तर ‘झाडावरुन फळ खालीच कां पडले?’ याचे कारण जानुन घेन्याचा प्रयत्न केला असता, गुरुत्वाकर्षन शक्तीचा शोध लागला. बुध्दांनी मांडलेले ते प्रमेय म्हणजेच ‘प्रत्यत्य समुत्पाद’ सिध्दांत होय. तर मग तो फॉर्मुला (प्रमेय) विकसित करनाऱ्याला वैज्ञानिक हा दर्जा दिला, तर यामध्ये त्यांचे काय चुकले?
अपौरुषेय तथा पारलौकिक हे दोन शब्द पन आपल्या वाचनातून गेलेच असतील. अपौरुषे़य या शब्दाचा वापर घटना या कृत्य संदर्भात वापरतात. अपौरुषेय घटना म्हणजे पुरुषाचा सहभाग नसलेली घटना. ब्राह्मणी मतानुसार ईश्वराद्वारा घटित दैविक घटना. म्हणजे पारलौकिक शक्ती. व ही शक्ती ज्यांच्यामध्ये असते, ते परलोकवासी असतात. परंतू जे इश्वराला मानित नाही, ते अपौरुषेय या शब्दाचा संबंध निसर्गाशी जोडतात. म्हणजे सदर घटना ही पुरुष या ईश्वर निर्मित नसुन निसर्ग निर्मित आहे, हे त्यांना अपेक्षित असते. व हे खरे ही आहे. निसर्ग निर्मित अश्या घटनेचा संबंध पारलौकिक शक्तिशी लावु नये म्हणुन तथागत बुध्दांनी प्रत्युत्य समुत्पाद नावाचा सिध्दांत प्रतिपादीत केला. कारण अश्या कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक घटनेमागे काही ना काही कारण असते, हे त्यांच्या शिकवणीचा मुख्य भाग होता.
इतर सर्व धर्मामधील त्यांच्या धर्मग्रंथामध्ये जे सांगीतले आहे/आदेश दिला आहे, हे त्यांच्या साठी शब्दप्रामान्य असते. तर्क करण्याची अथवा शब्द प्रामान्याची चिरफाड (चिकीत्सा) करन्याची इतर धर्मा मध्ये बिलकुल मुभा नसते, परंतु बुध्दिझम मध्ये मात्र शब्द प्रामाण्याला काही स्थान नाही. तर्क करणे, चिरफाड (चिकीत्सा) करने हाच तर बुद्धाची मुख्य शिकवणूक आहे. शब्द प्रामाण्य वादाचे खंडन तर तथागत बुद्ध स्वतः च कालाम सुत्त द्वारे करतात. हाच तर बुद्धिवाद कडे, विज्ञाना कडे नेण्याचा मार्ग आहे, जो इतर कुठल्याही धर्मात आढळत नाही. कारण इतर धर्मियाच्या धर्मग्रंथा मधील वचन हे त्यांच्यासाठी ईश्वरी प्रमाण असते.
‘घडणारी कोणतीही गोष्ट ही अंतिम नसते’, तथागत बुध्दाचा हा ‘अनित्यवाद’ सिध्दांत पण विज्ञानाचा पुरस्कार करतो
तेव्हा बुध्दाचा धम्म हा शुध्द रुपात विज्ञानाशी संबंधित आहे, असे माझे स्पष्ठ मत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत