व्याघ्र प्रकल्पांतील गुन्ह्यांच्या शोधासाठी श्वान पथक सज्ज

वन्यजीव क्षेत्रांतील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी लवकरच ‘स्निफर डॉग’ तैनात केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील पेंचसह देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये या श्वानांना तैनात केले जाणार आहे. ११ श्वान आणि त्यांना हाताळणाऱ्या २२ व्यक्तींना हरियाणा येथील पंचकुला येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे.वन्यजीव गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी ‘स्निफर’ श्वानचे प्रशिक्षण आता एक महत्त्वाचा टप्पा पार करणार आहेत. पंचकुला येथील ‘बेसिक ट्रेनिंग सेंटर-इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स’ (बीटीसी-आयटीबीपी) शिबिरात ११ तरुण श्वान आणि त्यांना हाताळणाऱ्या २२ व्यक्तींच्या नवीन तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया’ आणि ‘ट्रॅफिक’च्या या उपक्रमाअंतर्गत आता वन्यजीव क्षेत्रातील ‘स्निफर’ श्वानांची संख्या १०५ होईल. बेल्जियम मालिनॉईस जातीचे सहा ते नऊ महिन्यांचे तरुण श्वान आणि त्यांना हाताळणाऱ्या व्यक्ती सुमारे सात ते आठ महिने प्रशिक्षण घेतील. या प्रशिक्षणात त्यांना वन्यजीव क्षेत्रातील गुन्हे शोधून त्यावर अंकुश ठेवण्याचे कौशल्य शिकवले जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वन्यजीव ‘स्निफर’ श्वान पथके (पान ४ वर)
पोलीस खात्यात ज्याप्रमाणे मादक द्रव्ये आणि स्फोटकांचा शोध या श्वानांद्वारे घेतला जातो, त्याचप्रमाणे त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेचा वापर करून विविध वन्यजीव प्रजाती, त्यांचे अवयव आणि त्यांच्या तस्करीचा माग घेतील. यात वाघ, हत्ती, गेंडे, हरणांचे मास, जिवंत पक्षी, साप, साळिंदर, कासव आदी वन्यजीवांचा समावेश असल्याचे ‘ट्रॅफिक’चे सहयोगी संचालक डॉ. मेरविन फर्नांडिस यांनी सांगितले, तर भारतातील वन्यजीव गुन्हेगारी प्रतिबंध आणि शोध यासाठी ‘स्निफर’ श्वानांना प्रशिक्षण देण्याचा हा महत्त्वाचा कार्यक्रम २००८ मध्ये दोन श्वानांसह सुरू करण्यात आला होता. २०२२ अखेरपर्यंत या कार्यक्रमांतर्गत ९४ वन्यजीव ‘स्निफर’ श्वानांना प्रशिक्षित आणि तैनात करण्यात आले, असे डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाचे वरिष्ठ संचालक डॉ. दीपंकर घोष यांनी सांगितले. वन्यजीव गुन्हेगारी मोठ्या गुन्ह्यांपैकी एक आहे. वन्यजीवांच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी या गुन्ह्यांना आळा घालणे आवश्यक असल्याचे बीटीसी-आयटीबीपी, पंचकुलाचे महासंचालक म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत