भारतीय सैन्याच्या गाडीवर दहशतवाद्यांचा हल्ला, 3 जवान शहीद…

संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या ट्रकवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. भारतीय सैन्याकडून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. जवान आणि दहशवाद्यांमध्ये सध्या चकमक सुरु आहे. भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांना जीवंत पकडण्याचा किंवा त्यांना कंठस्नान घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारतीय सैन्याचा मोठा फौजफाटा घटनास्थळाकडे रवाना झाला आहे. संबंधित घटना ही जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात घडली आहे. विशेष म्हणजे महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. हा हल्ला थानामंडी परिसरात झाला. गेल्या महिन्यात राजौरीच्या कालाकोट येथे सैन्य दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन कॅप्टन आणि जवानही शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची घटना घडली आहे. संबंधित परिसर हा दहशतवाद्यांचा अड्डाच समजला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरात भारतीय सैन्याच्या जवानांवर अनेकदा हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात राजौरी-पुंछमध्ये झालेल्या हल्ल्यात 10 जवान शहीद झाले होते. या परिसरात सातत्याने जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक होत असते. गेल्या दोन वर्षात दहशतवादविरोधी अभियानाअंतर्गत 35 पेक्षा जास्त सैनिक शहीद झाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत