एम.फिल ही पदवी मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगावी…

या पदवीची मान्यता २०२२ मधेच काढून घेतली असतानाही काही विद्यापीठांमधे हा अभ्यासक्रम लावला जात असल्याचं निदर्शनाला आल्यावर आयोगाने यासंबंधी परिपत्रक जारी करुन खुलासा केला आहे. एम-फिल म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी या पदवीची मान्यता पूर्वीच रद्द करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी याबाबत सावधगिरी बाळगावी असा इशारा विद्यापीठ अनुदान आयोगानं दिला आहे. विद्यापीठांनी या पदवी अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश तातडीने थांबवावे असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. या मात्र पदवीची मान्यता काढून घेण्यापूर्वी ज्यांनी ती मिळवली असेल त्यांना पीएच डी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेतून सूट मिळण्याची सवलत कायम राहणार असल्याचं आयोगाच्या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांनीही या पदवीसाठी प्रवेश घेऊ नये असे आयोगाने सांगितले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत