आता प्रथम माझे कर्तव्य नंतर हक्क…

आवाहनकर्ता :- अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 )
चंद्रमणी गाडेकर ..संविधान प्रचारक .9096724600
जेंव्हा लोकशाहीतील किंवा इतर कुठल्याही सत्ताप्रकारातील मूलभूत हक्क धोक्यात येतात, तेंव्हा ते हक्क बाजूला ठेऊन कर्तव्यातून सिद्ध झाले पाहिजे. त्यासाठी अशा काळात अमेरिकन राज्यक्रांतीचा, फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास ताजा करावा लागतो.
केवळ एकट्या जॉर्ज वाशिंगटनने बेंजोमीन फ्रँक्लीन, थॉमस जेफरसन आणि थॉमस पेन या वैचारिक युवकांची मोट बांधली. या सर्वांनी मिळून तेरा वसाहतीतील नागरिकांची एकजूट करून त्यांच्यात राष्ट्रवादाची भावना वृद्धिंगत केली. त्यांच्यात त्यागाची आणि समर्पणाची भावना कृतीतून सिद्ध करण्याचा अग्नी चेतवला. तेंव्हा कुठे इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात सर्वसामान्य शेतकरी, मजूर, सर्वसामान्य जनता आपल्या घराच्या खिडक्यामधून इंग्रज सैनिकांवर गोळ्या झाडत होती…..!
तेंव्हा कुठे बलदंड इंग्रज शत्रूला (जो 3000 मैलावरून लढत होता, जो गर्भश्रीमंत आणि अफाट सैन्य आणि आधुनिक शस्त्राने सुसज्ज होता ) आणि इकडे अमेरिकन सैन्याच्या पायात बूट नसताना केवळ सॉक्स घालून, टाचामधून रक्त सांडत असतांना सुद्धा……
केवळ ” या चार महापुरुषांच्या आत्मविश्वासाने ” जनतेत आत्मविश्वास भरगच्चं ठासून भरल्यामुळेच हा अमेरिकेचा विजय आणि इंग्लंडचा पराभव होऊ शकला….!
या मधून एक निष्पन्न झाले की, एखाद्या लढ्यात जेंव्हा जनता आपल्या अस्तीत्वासाठी लढ्यात आपसातील सर्व मतभेद बाजूला सर्व जनता जेंव्हा त्या लढ्यात सामील होते, तेंव्हा विजय जनतेचाच होत असतो…..!!!
त्याचप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांतीला सुद्धा मोन्टेस्की्यू, रुसो, व्हालटेयर, दिदेरो सारखे वैचारिक लोमशाहिवादी विचारवंत लाभले, ज्यांनी 95% सर्वसामान्य जनतेचं वैचारिक क्रांतिचं नेतृत्व केलं म्हणूनच सर्वसामान्य जनतेने फ्रांसच्या 16 व्या लुईला कुटुंबासहीत फासावर लटकावलं……….!
यामधूनही तोच सिद्धांत सिद्ध झाला की, कोणत्याही राष्ट्रीय लढ्यात सत्तेवर असणारी विचारसरणी जेंव्हा सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्यासाठी सुरुवात करून, जनतेच्या अज्ञानामुळे निर्मान झालेल्या मतभेदाचा, हतबलतेचा लाभ उठविण्यास सज्ज असते. अशा वेळी जनतेनीच स्वतः होऊन यात पुढाकार घेऊन स्वतची अस्मिता टिकविण्यासाठी प्रत्येकाने तो लढा लढलाच पाहिजे…
आणि आज आमच्या देशातील 2023 च्या मावळत्या आणि 2024 च्या उगवत्या सूर्याला साक्षी ठेऊन, EVM +VVPAT वर 2024 च्या लोकसभेच्या आणि देशातील इतर सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्याची मागणी नव्हे तर आमचा तो हक्क समजून तो लढ्यातून सिद्ध करून हस्तगत करण्यासाठी सिद्ध होऊया….
सध्या ICU मध्ये गेलेल्या लोकशाहीला आणि संविधानाला , देशाला बाहेर काढण्यासाठी प्रथमोपचार हाच केला पाहिजे…..
त्यानंतर भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागायी सारख्या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी कर्तव्यातून सिद्ध होण्यासाठी कंबर कसुया….
आता कोणी महापुरुष जन्माला येणार नाही……
आता केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिलेलं भारतीय संविधानच महापुरुष आपल्यासोबत आहे…..
दुसरे कुणीही नाही….!!
म्हणूनच या लढ्यात सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी रॅलीच्या माध्यमातून सहभागी होण्यासाठी तन -मन -धनाने समर्पण करण्यासाठी तयार असाल तर जास्तीत जास्त लोकांनी रॅलीच्या वेळेस उपस्थित राहून योगदान देण्यात तयार असाल तर माझ्या खालील मो. नंबरवर 31 /12 / 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत जास्तीत जास्त जनतेनी व्हाट्सअपवर किंवा टेक्स्ट मेसेज “YES ” म्हणून करावा…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत