देशमुख्यपान

पहिला दलित पंतप्रधान.. तानसेनभाई ननावरे युनायटेड रिपब्लिकन्स

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मोदी विरोधी इंडिया आघाडीच्या समन्व्यक तथा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आलें त्यामुळे देशाला पहिला दलित पंतप्रधान मिळेल असे वातावरण निर्माण झाले आहें
. इंडिया आघाडीची चवथी बैठक दिल्ली हाटेल अशोका येथे संपन्न झाली आठ्ठावीस पक्ष बैठकीस उपस्थित होतें आघाडीला चेहरा आणि समन्वयक असावा अशी चर्चा अथवा मागणी होतीच सामना वर्तमान पत्रात अग्रलेख देखील छापून आणला होता
. बैठकीच्या पुर्व संध्येला बऱ्याच नेत्यांच्या गाठीभेटी फोना फोनी सुरु होत्या केजरीवाल ममतादीदी अखिलेश उद्धव ठाकरे अधिक सक्रिय होतें
. बैठकीच्या सुरवातीलाच ममता दीदी यांनी इंडिया आघाडीच्या समन्व्यक पदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा ठराव मांडला त्यास केजारीवाल यांनी अनुमोदन देताना समन्व्यक सोबत मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार करण्यात यावे अशी पृष्टी जोडली बैठकीस हजर असलेल्या आठ्ठावीस पक्ष प्रमुखां पैकी सतरा पक्ष प्रमुखांनी ममता आणि केजारीवाल यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली त्या मूळे देशाला पहिल्यांदा दलित पंतप्रधान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहें
. मल्लिकार्जुन खरगे हॆ पाचवेळा आमदार आणि दोनवेळा खासदार म्हणून निवडून आलेले जुने जाणते ज्येष्ठ व अनुभवी मात्तबर नेते आहें कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची अनेकवेळा संधी हुकली आहें दलित आणि मुस्लिम हा काँग्रेस पक्षाची वोट बँक आहें हॆ दोन्ही घटक खरगे यांच्या पाठीशी भरभक्कम पणे उभे आहेंत व असतील
. ओबीसी असलेले मोदी विरुद्ध एस सी असलेले खरगे अशी लढत रंगणार आहें
. बाबू जगजीवन राम हॆ पंतप्रधान पदाचे सक्षम उमेदवार होतें परंतु जातीयवादाणे पोखरलेल्या काँग्रेसने बाबू जगजीवांनाराम यांच्या नेतृत्वात निवडणुका लढविल्या आणि जिंकल्या देखील परंतु बाबू जगजीवनरराम यांना पंतप्रधान पदावर बसू दिले नाही बाबू जगजीवन राम यांच्या नंतर काँग्रेस पक्षात सुशील कुमार शिंदे यांचे नाव घेतले जाऊ शकते परंतु देशाचे गृहमंत्री तथा राष्ट्रपतीपदाचे उमेदवार पर्यंत त्यांची बोलवन करण्यात आली
स्वबळावर कांशीराम आणि मायावती यांनी पंतप्रधान पदाची दावेदारी केली होती त्या दृष्टीने प्रयत्न देखील केले परंतु त्यांना यश मिळू शकले नाही
. त्या मानाने खरगे यांची बाब अधिक उजवी वाटत आहें काँग्रेस पक्षाची डुबती नय्या सावरण्यासाठी खरंगे शिवाय दुसरा नावाडी नाही देशाच्या राजकारणाचा स्रोत बघता खरगे शिवाय पर्याय नाही परंतु त्या साठी गांधी घराण्याला मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल एका दलिताला पसंतप्रधान बनविण्याचा दिलदार पणा गांधी घराण्याने दाखविला पाहिजे अनेक वेळा संधी येऊनही खरगे यांना कर्नाटकाचे मुख्यमंत्री होऊ दिले नाही आणि त्या मुळेच मात्तबर मुरब्बी असलेल्या खरगे यांनी आधी निवडणुका जिंकूया त्या नंतर पंतप्रधान पदाचे नाव ठरवूया अशी सावध भूमिका घेतली व त्या नंतर काँग्रेस पक्षाने खरगेंच्या भूमिकेला दुजोरा देणारे अधिकृत ट्विट केले
. काही का असेना केजरीवाल ममतादीदी यांनी खरगे यांचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाच्या गळ्यात घातला आहें आता त्यातून काँग्रेस पक्षाला सुटका नाही
खरगे यांची उमेदवारी काँग्रेस व गांधी कुटुंब नाकारू शकत नाही देशातला दलित समांज ते कदापि सहन करणार नाही याचे भान ठेवावे
तानसेन ननावरे
युनायटेड रिपब्लिकन्स

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!