वलगुड येथे महामानवांस विनम्र अभिवादन

वलगुड ता.धाराशिव (नागेश नगरी) येथील पंचशील चौकात विश्वभुषण,महामानव,बोधिसत्व डाॅ.भिमरांव रामजी आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी पंचशिल युवा मंचच्या वतीने विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन धुप,दिप प्रज्वलीत करुन तसेच पुष्पहार अर्पण करुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिवचे संचालक डाॅ.डी.के.गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच सर्व अबाल वृद्धांनी मेणबत्ती प्रज्वलीत करुन अभिवादन केले.यानंतर सामुहीक बुद्ध वंदना घेण्यात आली या प्रसंगी डाॅ.गायकवाड यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागनाथ सरवदे,मा.ग्रां,पं.सदस्य दादारांव सरवदे,ग्रां.पं.सदस्य महेश सरवदे,सुर्यकांत सरवदे,विकी सरवदे,रविंद्र सरवदे,संतोष सरवदे,गौतम सरवदे,रामेश्वर सरवदे,सुरज सरवदे,अनिकेत माळाळे,रमेश सरवदे,प्रशांत सरवदे,शिवाजी थोरात,उत्तम सरवदे,गोरोबा सरवदे,सुमित सरवदे,स्वप्निल सरवदे,अमित बनसोडे इ.पंचशिल युवा मंचचे कार्यकर्ते व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत