अंतराळवीरास पाठवून सुखरूप परत पृथ्वीवर आणणे शक्य होईल : अंतराळ संशोधन संस्थेने केले सिद्ध

सतत नवनवी यशाची शिखरे सर करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक मोठे यश मिळवले आहे. चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉडयूल (पीएम) चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात इस्रोच्या वैज्ञानिकांना यश मिळाले आहे. चंद्रमोहिमेतल्या या मोठ्या टप्प्याची माहिती देताना इस्रोने असेही स्पष्ट केले की. आता चंद्रावरून पृथ्वीवर परतण्याची प्रक्रिया सोपी असेल
इस्रोद्वारे आज याबाबतची माहिती देताना सांगण्यात आले की, आम्ही आता अशा प्रकारच्या मोहिमांवर काम करत आहोत यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले जात आहे चांद्रयान मोहीम पूर्ण करून चांद्रयान-३ चे प्रोपल्यान मॉडयूल आता पृथ्वीच्या कक्षेत परतले आहे हे केवळ चांद्रयान मोहिमेसाठीच मर्यादित यश नव्हे तर कोणतेही यान अथवा अंतराळवीरांस अवकाश मोहीम पूर्ण करून पृथ्वीवर परत आणण्याची क्षमता सीद्ध करणारी कामगिरी आहे.
चांद्रयान- ३ चे प्रोपल्यान मॉडयूल सध्या पृथ्वीची प्रदक्षिणा घालत आहे २२ नोव्हेंबर रोजी त्याने १.५४ लाख किलोमीटर अंतर पार केले. प्रोपल्शन मॉडयूलच्या उर्वरित प्रवासास १३ दिवस लागू शकतात, प्रोपल्लन मॉडयूल चंद्राच्या कथेतून पृथ्वीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत