कृतज्ञ देशाची महामानवाला आदरांजली ,भीमांजली… वर्ष ८ वे !!!

‘ बाबासाहेबांना संगिताची फार गोडी होती . आपणास चांगले गायन , वादन यावे असे त्यांना वाटे. सकाळी ऑफिसला जाण्यापुर्वी बाबासाहेब वैद्य यांच्याकडून फिडल वाजवण्याचे धडे घेत असत. बाबासाहेबांनी मुंबईत नाना व बाळ साठे या बंधूद्वयांकडून व्हायोलिनचे धडे घेतले होते. त्यांना तबला वादनाची आवड होती . बाबासाहेबांकडे संगीताच्या एलपी रेकॉर्डचा संच होता. बाबासाहेब यांच्याकडे अखेरच्या क्षणापर्यंत असणारा एलपी रेकॉर्डचा संच नागपुरात शांतीवन स्मृती संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.
या सर्व बाबी लक्ष्यात ठेवून ‘भीमांजली’च्या माध्यमातून बाबासाहेबांना सुरेख वाद्यांच्या बुद्धं शरणं गच्छामि च्या स्वरात आदरांजली वाहण्यात येते.
संगितात जात पात धर्म हे भेदभाव नसतो. ७ स्वर , २२ श्रुती या निसर्ग निर्मित आहेत. सर्व मानवांना एकत्र बांधणारी ही स्वरांची चेतना आहे . चर्म वाद्य , तंतुवाद्य ,सुषिर वाद्य, घनवाद्य ह्यांची मोठी परंपरा भारतीय संगित क्षेत्राला आहे.
बाबासाहेबांच्या मनातील ही वेगळी आवड लक्षात घेऊन राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती व तालविहार संगित संस्था दरवर्षी 6 डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी सकाळी 6 वाजता शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करते.
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मार्गदर्शक डॉ. हर्षदीप कांबळे सर या कार्यक्रमाच्या बाबतीत म्हणतात की डॉ. बाबासाहेबांना संगीताची आवड होती म्हणूनच आपण जगातील सर्वोत्तम वादकांकडून बाबासाहेबांना शास्रीय संगीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करतो . पहाटेचे सुमधुर शास्त्रीय संगीत आपलयाला ध्यानधारणाच्या (विपश्यना) अवस्थेत नेते .
भीमांजली कार्यक्रमाला २०१६ साली पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बुद्धम शरणम गच्छामि च्या बासरी वादनाने सुरवात केली आणि त्यानंतर आजतागायत जगविख्यात कलाकार बुद्धम शरणम गच्छामि , भीमराया घे तुला या लेकरांची वंदना , अशा वाद्य स्वरांनी बाबासाहेबांना वंदन करतात.
यात प्रामुख्याने पंडीत भवानी शंकर (पखवाज), पंडीत अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन ), उस्ताद दिलशान खान (सारंगी), उस्ताद शाहिद परवेजखान (सितार) , फ्लूट सिस्टर म्हणून प्रसिदध असलेल्या सुचिस्मिता व डेबूप्रिया चॅटर्जी (बासरी), पंडितप्रभाकर धाकडे (व्हायोलिन) , पंडित रोनू मुजुमदार (बासरी) , उस्ताद रफिक खान , शफिक खन (सितार), पंडित संगिता शंकर (व्हायोलिन), पंडीत नॅश नॅबर्ट (बासरी) ,पंडित तेजस उपाध्ये (व्हायोलिन), उस्ताद उस्मान खान (सितार), पंडित रितेश तागडे (व्हायोलिन),पंडित राकेश चौरसिया (बासरी) पंडीत मिलिंद रायकर आणि यज्ञेश रायकर (व्हायोलिन ),उस्ताद साबिर खान (सारंगी ),अभय भजन सोपारी (संतूर) व या सर्वांच्या बासरी , वीणा , व्हायोलिन , सितार वादनाला अखंड साथ देणारे तालविहारसंगित संस्था प्रमुख जगप्रसिद्ध तबला वादक पंडित मुकेश जाधव.
यावर्षीच्या राष्ट्रनिर्माते डॅा बाबासाहेब आंबेडकरांच्या ६७व्या महापरिनिर्वाण अभिवादन कार्यक्रमाची सुरूवात
या खालिल जगप्रसिद्ध कलाकारांकडून होणार आहे
1)पद्मभूषण डॉ एन राजम (व्हायोलिन)
२)पंडित प्रविण गोडखिंडी (बासरी)
३)उस्ताद फारूख लतिफ खान (सारंगी)
4)पंडीत मुकेश जाधव (तबला )
स्थळ : श्री शिवाजी मंदिर ,प्लाझा सिनेमा समोर दादर .
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातील वरीष्ठ सनदी अधिकारी , ज्युडिशरीमधिल अधिकारी , पत्रकार , लेखक , कवि , नाटककार, सिनेमा नाटक क्षेत्रातील कलावंत , सामाजिक संस्था , समाजसेवक , राजकीय पदाधिकारी , उद्योजक , डॅाक्टर , इंजिनिअर , वकील, महिला व समाजातील सर्वच लहान थोर घटक या वैशिष्टयपूर्ण अभिवादनात सहभाग घेतात.
सकाळी सूर्योदयापूर्वी बाबासाहेबांना शास्रीय संगीतातून आदरांजली वाहणारी व सतत आठ वर्ष चालणारी ही सांगितिक परंपरा केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनोखी घटना आहे.
हा कार्यक्रम विनामूल्य सादर केला जातो. आपण सर्वांनी ६ डिसेंबर सकाळी ६ वाजता आपल्या आप्तस्वकियांसह मित्रमंडळीसह श्री शिवाजी मंदिर प्लाझा सिनेमासमोर दादर येथे यावे ही विनंती
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत