
अमेरिकेच्या मिसुरी राज्यातील तीन घरांमध्ये अडकलेल्या अवस्थेत अनेक महिने काढलेल्या या पीडिताचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
‘संपूर्णपणे अमानवी आणि अनुचित’ असे वर्णन करण्यात आलेल्या एका घटनेत, चुलतभावासह इतर दोघांनी प्रसाधनगृह वापरण्यास मज्जाव केलेल्या, क्रूरपणे मारहाण केली जाणाऱ्या, तीन घरांमध्ये बळजबरीने काम करायला लावलेल्या आणि अनेक महिने बंदी बनून ठेवलेल्या वीस वर्षांच्या एका भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी सुटका केली आहे.
या असहाय तरुणाच्या परिस्थितीची कल्पना आल्यानंतर एका जागरूक नागरिकाने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातले. हा पीडित तरुण आता सुरक्षित असून, अनेक हाडांचे फ्रॅक्चर, तसेच संपूर्ण शरीरावर असलेल्या जखमा यांसाठी त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
तीन आरोपींनी सात महिन्यांहून अधिक काळ या विद्यार्थ्याला एका तळघरात कैद करून ठेवले आणि त्याला उघड्या फरशीवर झोपायला लावले व प्रसाधनगृहाचाही वापर करू दिला नाही, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत