भारतमुख्य पानमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

बंगळूरु येथे शुक्रवारी सकाळी ६८ खासगी शाळांना त्यांच्या आवारात-परिसरात बॉम्ब असल्याचा इशारा

अफवा आहे की सत्यता शासन चिंतेत

बंगळूरु येथे शुक्रवारी सकाळी ६८ खासगी शाळांना त्यांच्या आवारात-परिसरात बॉम्ब असल्याचा इशारा देणारा ‘ई-मेल’ आला. हा ‘ई-मेल’ मिळाल्यानंतर शाळेतील कर्मचारी आणि पालकांमध्ये घबराट पसरली. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ शाळेच्या आवारातून बाहेर काढण्यात आले. हा संदेश ‘kharijites@beeble.com’ या ‘ईमेल आयडी’वरून आला आहे, अशी माहिती गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी पत्रकारांना दिली.

पोलिसांनी सांगितले, की शाळेच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर ते बॉम्ब निकामी पथक आणि तोडफोड नियंत्रण व तपास पथकासह संबंधित शाळांत पोहोचले. संध्याकाळपर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. बॉम्बची धमकी मिळालेल्या ६८ शाळांपैकी ४८ शाळा शहराच्या हद्दीत आहेत तर उर्वरित बंगळूरु ग्रामीण हद्दीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अशी धमकी मिळालेल्या एका शाळेला भेट दिली. त्यांनी शाळा आणि पोलिसांकडून परिस्थितीची माहिती घेतली. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. काही विघ्नसंतोषी समाजकंटकांनी हे कृत्य केले असावे. आम्ही त्यांना २४ तासांत पकडू असे ते म्हणाले.

या घटनेची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना समजताच कमालीची घबराट पसरली. आपापल्या मुलांना सुखरूप घरी आणण्यासाठी या पालकांनी शाळेत धाव घेतली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की आतापर्यंत बंगळूरुमधील ६८ शाळांना बॉम्ब ठेवल्याबद्दल ईमेल मिळाले आहेत. बॉम्ब असल्याच्या या धमकीचा संदेश एकाच ‘ईमेल आयडी’वरून आला होता. शोध मोहीम जवळपास पूर्ण झाली आहे आणि आतापर्यंत आमच्या पथकाला कोणत्याही शाळेच्या परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, गेल्या वर्षीही काही समाजकंटकांनी बंगळूरुच्या शाळांमध्ये बॉम्ब असल्याचा दावा करणारे असेच ‘ई मेल’ पाठवले होते, त्यानंतर या अफवा ठरल्या होत्या.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!