महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

शिक्षकांची आता आंतरजिल्हा बदली होणार.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा शासनाने सुरू केला. ६ डिसेंबरपर्यंत बदलीपात्र शिक्षकांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. बदलीच्या ऑनलाईन पोर्टलवर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचा शिक्षकांचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शिक्षकांना संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यासाठी स्वतंत्रपणे लॉगीन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे.राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत सुधारित धोरण ०७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे.

त्यानुसार ३० जून २०२३ ला बदलीस पात्र असतील, अशा शिक्षकांनाच अर्ज भरण्याची संधी देण्यात येईल. २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्यांनी अर्ज केले; परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया राबवत असताना जे पात्र असूनही रिक्त जागेअभावी बदली मिळाली नव्हती,अशांना २०२२ मध्ये भरलेल्या अर्जात जिल्हा बदलण्यास एडिट करण्यास संधी देण्यात आली आहे. न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडील अपील प्रकरणात बदल्यांबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले असतील, त्या शिक्षकांनाही बदलीसाठी संधी देण्यात येईल. त्यासाठी संबंधित शिक्षकांनी सदर न्यायालयीन/ विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अर्जाबरोबर पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!