देश-विदेशमुख्यपान

इस्रायल आणि हमास मध्ये पुन्हा युद्धाचा शंक फुकला जाण्याची शक्यता

युद्ध पुन्हा सुरू होणे विनाशकारक असल्याची प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेचे अधिकारी व्होल्कर टर्क यांनी व्यक्त केली आहे. इस्रायल आणि गाझादरम्यान २४ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या शस्त्रविरामाला आणखी मुदतवाढ मिळण्याचे प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. इस्रायलने शुक्रवारपासून पुन्हा गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले. शस्त्रविराम संपल्याबद्दल इस्रायल आणि हमास या दोघांनीही एकमेकांवर दोषारोप केला.

 हमासने शस्त्रविरामाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप इस्रायलने केला. तर अधिक ओलिसांची सुटका करण्याचा आपला प्रस्ताव इस्रायलने नाकारला असे उत्तर हमासकडून देण्यात आले. दरम्यान, इस्रायलने पुन्हा हल्ले सुरू केल्याबद्दल कतारने खेद व्यक्त केला आणि पुन्हा शस्त्रविराम होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कतारच्या मध्यस्थीने आणि इजिप्त व अमेरिकेच्या समन्वयाने गेल्या आठवड्यात शस्त्रविरामावर सहमती होण्यावर यश मिळाले होते.

सर्वात आधी चार दिवसांचा शस्त्रविराम जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर त्याला दोन दिवस आणि नंतर एक दिवस अशी एकूण तीन दिवसांची मुदतवाढ मिळाली होती. ही मुदतवाढ पुढेही सुरू ठेवावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव टाकला जात होता. मात्र, त्याला यश आले नाही.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!