महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
“एकनाथ शिंदेंना ‘ते’ पत्र इंग्रजीत का पाठवलं? सुनील प्रभूंना जेठमलानींनी केला प्रश्न”

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची नियमित सुनावणी पार पडली. सुनावणीच्या पहिल्या सत्रात शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रावरुन प्रश्न विचारले. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवली. त्यावेळी काही प्रश्नांवर सुनील प्रभू अडखळले तर काही प्रश्नांवर उत्तरं देताना नीट लक्षात नाही असं म्हणाले.
पत्राचं नेमकं हे प्रकरण काय?
सुनील प्रभू यांनी प्रतिज्ञापत्रातल्या ५० व्या परिच्छेदात एक पत्र जोडलं आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच विषयी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना प्रश्न विचारले. हे प्रश्न तुम्हीच लिहिलंत का? इंग्रजीत का लिहिलंत? सही तुमचीच आहे का? असे अनेक प्रश्न जेठमलानींनी विचारले. तसंच हे पत्र एकनाथ शिंदेंना मिळालंच नसल्याचा युक्तिवादही जेठमलानी यांनी केला. मात्र सुनील प्रभू यांनी हे खोटं असल्याचं म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत