
हंसराज कांबळे✍️
८६२६०२१५२०
नागपूर.
मी भारताची घटना लिहिली आहे आणि भारतीय घटनेचा मी शिल्पकार आहे असे वक्तव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असून जगमान्य आहे.स्वयंप्रकाशित मनुष्य दुसऱ्या भोवती केव्हाही उपग्रह म्हणून फिरत नसतो , डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंभू , स्वयंप्रकाशित , स्वतंत्र प्रज्ञावंत होते .ते वादळी मनोवृत्तीचे होते. माझे नाव हिंदुस्थानच्या त्रिकोणात आहे. मी आज आहे उद्या नाही. माझ्या कार्याचा इतिहास जर कोणी दिला तर तो बराच मोठा होईल असे मला वाटते असे म्हणणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे हे विचार भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ह्यांनी सदविवेकबुद्धीने जाण ठेवून हेरले आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ज्या सत्ताधारी ब्राम्हणसंघाच्या विकृत बुद्धीची नाडी भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड सर यांनी यथार्थपणे ओळखून सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येत्या 26 नोव्हेंबर रोजी सविधान दिनानिमित्त भारताचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते अनावरण होणार आहे त्यांनी घेतलेला निर्णय दूरदृष्टीपण विचारपूर्वक आहे कारण सत्ताधारी ब्राह्मण संघानी यापूर्वी महत्त्वाचे कार्यक्रम भारतात राबविले , आयोजित केले त्यात आदिवासी समाज वर्गात मोडत असेलल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्म ह्यांना बुद्धीपुरस्सर डावलण्यात आले होते. हे आपण भारतातल्या सगळ्या जाणकार लोकांनी हेरून घेतलें आहे. तीच कास धरून आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सर ह्यांनी सकारात्मक विचार करून , पदाचा मान ठेऊन भारताच्या राष्ट्रपतीला मानाचे स्थान दिले आहे.न्यायालयाच्या परिसरात देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असा पुतळा भव्य दिव्य उभारला जाणार आहे आनंदाची बाब आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिभेदाचे उच्चाटण करण्यावर एवढा प्रचंड भर दिला की ,कार्ल – मार्क्स यांचा ” वर्गकलह ” हा शब्द जसा जगातील कानाकोपऱ्यात निनादला. तसा ” जातीभेद ” हा शब्द त्यांनी जगात निनादुन सोडला या देशात लोकशाही आहे. परंतु त्या लोकशाहीने आपली बुद्धी चालवण्याचे स्थगित केले आहे. तिने आपले हातपाय एकाच पक्षाशी जखडून ठेवले आहे. त्या पक्षाचे विचार आणि त्यांची कृती याविषयी कठोर चिकित्सा करून न्याय निवाडा करण्याची तिची तयारी नाही. माझ्या मते हे मोठे दुखणे आहे. तो एक रोग आहे. मोठे आजार पण आहे. त्या रोगाने आपल्या सर्व लोकांना पछाडले आहे. त्याने ते बधिर झाले आहेत
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर. लेखक धनंजय कीर. पृष्ठ. क्र.३३१.पैरा – २.
वरील संदर्भीय वाक्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भारतातल्या जागृत मतदार लोकांनी ज्यांच्या हातात आणि खांद्यावर सत्ता सांभाळण्यासाठी धुरा दिली आहे त्यांनी देश विकसनशील होण्यासाठी आणि लोकांचे हित जपण्यासाठी कार्यरत असावे. हेच त्यांना सांगावयाचे होते. ३ ऑक्टोंबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आकाशवाणीवर माझे वैयक्तिक तत्त्वज्ञान या मालिकेत एक भाषण झाले. त्यात ते म्हणाले होते की ,प्रत्येक मनुष्यास जीवनाचे तत्त्वज्ञान असले पाहिजे. कारण आपली वर्तणूक मोजण्यास प्रत्येकाजवळ कोणती तरी मापकाठी असायला हवी , तत्त्वज्ञान म्हणजे दुसरे काही नसून ज्याने आपले जीवन मोजायचे आहे की मापकाठीच होय
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर. लेखक धनंजय कीर. पृष्ठ. क्र.५०८ .
पुढे ते म्हणतात –
माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे निश्चितपणे तीन शब्दात गुंफले जाण्याचा संभव आहे. ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य , समता व बंधुभाव हे माझे तत्त्वज्ञान फ्रेंच राज्यक्रांती पासून मी उसने घेतले नाही. असे कोणीही समजू नये. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहे. राज्यशास्त्रात नाही.माझा गुरु बुद्ध यांच्या शिकवणी पासून ते मी काढले आहे.
माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समता यांना जागा आहे. परंतु अपरिमित स्वतंत्रतेने समतेचा नाश होतो आणि निर्भळ समानता स्वातंत्र्याला वाव ठेवीत नाही. माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समता यांचे उल्लंघन होऊ नये म्हणून केव्हा संरक्षण म्हणून निर्बंधला स्थान आहे. परंतु निर्बंध हा स्वातंत्र्य आणि समता यासंबंधी होणाऱ्या उल्लंघनाविरुद्ध हमी देऊ शकतो असा माझा विश्वास नाही.माझ्या तत्त्वज्ञानात बंधूतेस फार उच्च स्थान आहे. स्वातंत्र्य आणि समता यांच्याविरुद्ध संरक्षण फक्त बंधू भावानेच आहे. त्याचे दुसरे नाव बंधुता किंवा मानवता आणि मानवता हेच धर्माचे दुसरे नाव आहे
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्र.५०९.
म्हणून लोकशाहीच्या मार्गात न्यायपालिकेने घेतलेला योग्य निर्णय ऐतिहासिक असाच आहे.
दिनांक
२४ नोव्हेंबर 23.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत