आर्थिकउद्योगमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

अकोला-अमरावती विश्वविक्रमी  महामार्गाचे लोकार्पन महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते “गिनिज बुकमध्ये झाली नोंद”

गडकरी म्हणाले, हा विक्रम अमरावती-अकोला जिल्ह्यात नोंदवला जाणे हे विशेष आनंददायी आहे. या विक्रमाचे प्रतीक म्हणून उभारलेला अप्रतिम स्तंभ या विक्रमाची ग्वाही देत आहे. बाजूला असलेल्या उड्डाण पुलावर देशाचा गौरव वाढविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची चित्रे रेखाटली असल्यामुळे आसपासच्या परिसरातील बालगोपालांना हे स्थळ सहलीसाठी उत्तम ठरेल. या महामार्गामुळे अमरावती-अकोला हे अंतर केवळ ५० मिनिटांत पार करता येणे शक्य आहे.  विदर्भातील ७५ किलोमीटर अंतराच्या अकोला-अमरावती महामार्ग निर्मितीचा १०५ तास सलग कामाचा गिनिज बुकमध्ये नोंदविण्यात आलेला विश्वविक्रम गुरुवारी एका विशेष स्तंभाच्या माध्यमातून देशाला समर्पित करण्यात आला. बडनेरा वाय पॉईंट येथे राजपथने उभारलेल्या विश्वविक्रमी स्तंभ स्मारकाचे अनावरण केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिमाखदार कार्यक्रमात पार पडले.

यावेळी सौ. कांचन गडकरी, खा. अनिल बॉड, खा नवनीत राणा, आ. प्रवीण पोटे पार्टील, आ. प्रताप अडसड, आ. सुलभा खोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!