महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भाजपविरोधी हल्लाबोल.

दि. 23/11/2023

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या भूमिकेमुळे अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप आणि शिवसेना वाद शेकापच्या पथ्यावर पडला होता. यानंतर शिवसेनेचा शिंदे गट भाजपविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

शेकापची दुसरी फळी म्हणून जर भाजप नेते काम करणार असतील तर यापुढे कुठल्याच पातळीवर भाजपशी सलगी नको असा पवित्रा शिवसेनेच्या शिंदे गटाने घेतला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघही शिवसेनेला मिळावा अशी मागणी त्यांनी केली. या वेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मित्रपक्षांच्या निवडणुकीतील भूमिकेचा समाचार घेतला.

जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. शेकापमधून भाजपमध्ये आलेले काही नेते ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पडावे यासाठी कार्यरत होते. शेकापमधून भाजपमध्ये आलेले काही नेते ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पडावे यासाठी कार्यरत होते. शेकापची दुसरी फळी म्हणून त्यांनी आपली भूमिका बजावली.

यामुळे शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. याचा फटका पक्षाला बसला. पदाधिकाऱ्यांच्या या मागणीला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही पाठिंबा दर्शवला. अलिबाग, मुरूड आणि रोहा तालुक्यातील शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा अलिबाग येथील होरायझॉन सभागृहात पार पडला.

या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या आणि लढलेल्या उमेदवारांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. भाजपला निवडणुकीत फारसे यश मिळाले नाहीच पण त्यांच्या भूमिकेमुळे शेकापचा फायदा झाला. त्यामुळे मित्र पक्ष असलेल्या भाजपकडून सातत्याने अशी भूमिका घेतली जात असेल. तर पक्षानेही वेगळा विचार करायला हवा अशी मागणी जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!