महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
“भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना डोळ्यांचा चष्मा लागला“…या वक्तव्याचे आता काढले जात आहेत राजकीय अर्थ

दि. 23/11/2023
पूर्वी मला जवळचं नीट दिसत नव्हतं, आता मला चांगलं दिसायला लागेल, असं मिश्किल वक्तव्यही पंकजा मुंडेंनी केलं आहे. या वक्तव्याचे आता राजकीय अर्थ काढले जात आहेत. यावर आता प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडेच्या वक्तव्याबाबत विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “पंकजा मुंडेंचं बरोबर आहे. त्यांचा घात त्यांच्या जवळच्याच माणसाने केला आहे. त्यामुळे त्यांनी चष्मा बदलायला हवा होता.
त्यांनी योग्य वेळी त्यांचा चष्मा बदलला आहे. आता त्या चष्म्यातून त्यांनी व्यवस्थित राजकीय लक्ष्य साधावं” सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली. त्यांनी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या सुप्रसिद्ध गाण्याचा सूर लावत “ताईला चष्मा लागला, ताईला चष्मा लागला” असं नवं गाणं सादर करत चष्मा लागल्याची माहिती दिली. त्यांचा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत