महाराष्ट्रमुख्यपान

राज्य परिवहन महामंडळात नवीन वर्षांत ३ हजार ४९५ एसटी बसेस दाखल होणार. प्रस्तावास मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली.

दि. 23/11/2023.

प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळाच्या ताफ्यात नवीन वर्षांत ३ हजार ४९५ एसटी बसेस दाखल होणार असून, बस स्थानकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच, त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

त्यात ३४९५ नवीन गाडया खरेदी करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकावर ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी राज्य परिवहन महामंडळाला दिले.

महामंडळाला २० नोव्हेंबरला एका दिवशी ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल शिंदे यांनी अभिनंदन केले. राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. या वेळी २२०० साध्या बस घेण्यास मंजुरी दिली.

या २२०० परिवर्तन साध्या बस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळय़ा विभागांसाठी १२९५ साध्या बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!