नाताळचा सण आणि हिवाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेच्या ३६ विशेष रेल्वे गाड्या.

नाताळचा सण आणि हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विविध ठिकाणांहून ३६ विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. या गाड्यांमध्ये मुंबई-थिविं, पुणे-करमळी, पनवेल-करमळी आणि पुणे-अजनी, मुंबई-मंगळुरु-मुंबई आणि मुंबई-करमळी-मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचा समावेश असणार आहे.
२२ डिसेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२४ दरम्यान या गाड्या धावणार आहेत. या विशेष गाड्यांच्या तिकिटांचं आरक्षण उद्यापासून विशेष शुल्क आकारून मध्य रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांसह www.irctc.co.in या संकेत स्थळावर सुरु होईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत