शेनिस पॅलिसिओस ठरली ‘मिस युनिव्हर्स 2023

2023 मिस युनिव्हर्स स्पर्धा शनिवारी पार पडली. 23 वर्षाची शेनिस पॅलासिओस मिस युनिव्हर्स 2023 या स्पर्धेची विजेती ठरली आहे. या स्पर्धेच्या विजेतीची घोषणा झाल्यानंतर मिस युनिव्हर्स 2022 आर बॉनी गॅब्रिएलने तिचा क्राऊन शेनिस पॅलासिओसला दिला. आता जगभरातून शेनिस पॅलासिओसचं कौतुक होत आहे.
मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेमधील अंतिम फेरीमध्ये स्पर्धेच्या फायनलिस्टला प्रश्न विचारण्यात आला की, “जर तुम्हाला दुसऱ्या महिलेच्या शूजमध्ये एक वर्ष जगण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?”.
मिस निकाराग्वा शेनिस पॅलासिओसने अंतिम फेरीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे दिलेले उत्तर हे सर्वात वेगळे दिले. तिने उत्तर देताना मेरी वॉलस्टोनक्राफ्ट यांच्या नावाचा उल्लेख केला. मेरी या महिला हक्कासाठी लढलेल्या कार्यकर्त्या आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जातात.
अंतिम फेरीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मिस ऑस्ट्रेलियाने तिला तिच्या आईच्या शूजमध्ये पाऊल ठेवायला आवडेल असे सांगून तिच्या आईचा सन्मान केला. तर मिस थायलंडने उत्तर देताना मलाला युसूफझाई यांचे नाव घेतले. तिने सांगितले की, त्यांचा संघर्ष आणि यश तिला खूप प्रेरणा देतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत