छगन भुजबळ यांचा मी व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध करतो- मनोज जरांगे यांच टीकास्त्र.

छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून विरोध करण्यात येत आहे. भुजबळांचा देहूमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी म्हातारा म्हणत उल्लेख केला. तसंच त्यांच्यावर टीकास्त्र डागलं. छगन भुजबळ यांचा मी व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध करतो, असं ते म्हणाले.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात दौरा करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करणाऱ्या ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर जरांगे पाटील हल्लाबोल करत आहेत. पुण्यातील देहूमध्ये बोलतानाही त्यांनी भुजबळांवर घणाघात केलाय. छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते. पण व्यक्ती म्हणून कधीच मी त्यांना विरोध नव्हता. मात्र आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत