जरांगेंची आज पुणे, कल्याणमध्ये सभा ; जरांगे पाटलांची तोफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार.

मराठा समाजाच्या आरक्षणचा लढा देणाऱ्या जरांगे पाटलांनी रुग्णालयातून बाहेर पडताच राज्यभर दौरा करण्याचे जाहीर केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांना कल्याणमध्ये आणण्याचे प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू होते. त्यानुसार जरांगेंची आज पुणे, कल्याणमध्ये सभा होणार आहे. या दौऱ्यात जरांगे पाटलांची तोफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार आहे. कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात सभेचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या होमग्राउंडवर जरांगे पाटील काय बोलणार, याकडे लक्ष आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत