राष्ट्रवादी कुणाची? ; आज आयोगासमोर सुनावणी

राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह नेमकं कुणाचं याबाबत आज महत्वाची सुनावणी होणार आहे. दिल्लीत आज संध्याकाळी 4 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. सलग तीन दिवस ही सुनावणी चालेल. मागच्या सुनावणीवेळी शरद पवार यांच्या गटाकडून युक्तिवादावेळी अजित पवार गटावर बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला होता. अजित पवार गटाचा युक्तिवाद आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे आज शरद पवार गटाकडून युक्तिवाद होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
राष्ट्रवादी पक्षाबाबत आज महत्वाची सुनावणी होत असताना या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हजर राहणार आहेत. त्यासाठी शरद पवार पुण्याहून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. या सुनावणीला शरद पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत