
भारतीय भांडवली बाजारात, विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत सुमारे चौदा हजार कोटी रुपये गुंतवले आहेत. गेल्या अडीच महिन्यात विक्री सुरू ठेवल्यानंतर, एफपीआयनं नोव्हेंबरमध्ये १ हजार ४३३ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. याच कालावधीत भारतीय कर्ज बाजारामध्ये त्यांनी १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. नोव्हेंबरमध्ये भारतीय भांडवली बाजारात एकूण निव्वळ गुंतवणूक १३ हजार ७६३ कोटी रुपयांवर गेली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत