ललित पाटील प्रकरणामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे अमली पदार्थ तस्करी रॅकेट उद्धवस्त केले. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला ललित पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, पाटीलला अटक करण्यापूर्वीच तो ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याला मुंबई पोलिसांनी बेंगळुरू-चेन्नई पट्ट्यातून अटक केली. ससून रुग्णालयातील कैद्यांच्या उपचार कक्षात नियुक्तीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य योग्यपद्धतीने बजावले नाही; तसेच पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका ठेवून दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
नाथाराम काळे आणि अमित जाधव अशी अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून मेफेड्रोनची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी ललितच्या साथीदाराला आणि ससून रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगाराला अटक केली. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना ललित पाटीलने दोन ऑक्टोबर रोजी बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पलायन केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत