मुंबईकरांनो उद्या बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या रविवारचा मेगाब्लॉक.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर शनिवारी सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. यामुळे चर्चगेट ते विरार डहाणू रोडदरम्यान रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.
धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत