पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचे अपघाती निधन.

नेरळ दि.7 नोव्हेंबर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख, नेरळ ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचे मोटार अपघातात दुःखद निधन झाले आहे.

या बाबतची हकीकत अशी की, मध्यरात्री 3.30 च्या सुमारास धर्मानंद गायकवाड सह चार कार्यकर्ते इनोव्हा कारने घरी परतत आसतांना कर्जत -किरवली ब्रिजवरून त्यांची इनोव्हा कार ब्रिजवरून खाली रेल्वे ट्रॅकवर पडली. याच वेळेस ब्रिजखालून एक मालगाडी जात होती. या मालगाडीच्या शेवटच्या डब्यावर इनोव्हा कार आदळली असे समजते.या अपघातात धर्मानंद गायकवाड यांचे सह त्यांचे दोन मावसभाऊ नितीन जाधव व मंगेश जाधव यांचाही दुर्दैवाने मृत्यु झाला असून पत्रकार जयवंत हाबळे व संतोष जाधव हे जखमी झाले असून त्यांना हास्पिटल मध्ये हलविण्यात आले आहे.

दुपारी नेरळ येथे झालेल्या अंत्यविधीला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले, आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते त्यांनी कालकथित धर्मानंद गायकवाड यांना आदरांजली वाहिली. अंत्ययात्रेत रिपब्लिकन नेते आण्णासाहेब रोकडे, प्रवीण मोरे, दयाल बहादुरे, आर पी. आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, महागायिका निशाताई भगत, आशालता भगत, आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे, सचिव लक्ष्मण अभंगे, बौद्धाचार्य गोपाळ जाधव, आर. पी आय कर्जतचे नेते उत्तम जाधव, तसेच सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळीतील शेकडो कार्येकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.


संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत