“विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस आज शहरात समस्त आंबेडकरवादी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने उत्सहात साजरा”

ऐतिहासिक दिवस आज ७ नोव्हेंबर १९०० रोजी विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आज जगभरात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो यानिमित्ताने आज दि.७ नोव्हेंबर २०२३ मंगळवार रोजी समस्त आंबेडकरी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने भड़कल गेट येथे महामानवाला पुष्पहार अर्पण करुण महापुरुषांच्या नावे गगनभेदी घोषणा देत अभिवादन करुण साजरा करण्यात आला, यावेळी महामानवाच्या जीवनामध्ये त्यांना शिक्षण घेण्यासाठी किती संघर्ष करावा लागला, तरीही त्यांनी हा संघर्ष करीत शिक्षण घेवून सर्व समावेशक काम करित या भारत देशाचे संविधान लिहुन अवघ्या जगासमोर एक आदर्श घालुन दिला आहे, यामूळे बाबासाहेबांचे विचार जगभरात आदर्श ठरत आहेत.आपल्या प्रत्येक भारतीय नागरीकांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक घरा घरात महामानवा प्रमाणे आदर्श विद्यार्थी घड़ावावेत असा संकल्प यावेळी करण्यात आला यावेळी दिपक निकाळजे, श्रीरंगदादा ससाने(जेष्ठ नेते), डॉ.विलासजी जोंधळे सर(विचारवंत),आनंद कस्तुरे, विजय शिंदे,सचिन जोगदंड, स्वप्निल शिरसाठ, नागेश केदारे, त्रिशरण गायकवाड,नितीन निकाळजे, सिध्दार्थ सूर्यवंशी, हरीश पाटील, आकाश ओंकार,यावेळी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व आंबेडकरवादी बहुजन विकास समीतीचे पदाधिकारी व सर्व भिमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सर्व उपस्थित जिगरबाज भीमसैनिकांचे आभार, क्रांतिकारी जय भीम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत